Psalms 53 (IRVM)
undefined दाविदाचे स्तोत्र 1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही.ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे;त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही. 2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की,जर तेथे कोणी समजदार आहे,आणि जो देवाचा शोध घेतो. 3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे;सर्व भ्रष्ट झाले आहेत;त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही. 4 ज्यांनी अन्याय केला,त्यांना काहीही माहित नव्हते काय?ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले,पण ते देवाला हाक मारत नाही. 5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते;कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत;असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे. 6 अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो!जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील,तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!