Psalms 62 (IRVM)
undefined दाविदाचे स्तोत्र 1 माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे;त्याच्यापासून माझे तारण येते. 2 तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे;तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही. 3 झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या,एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजणकिती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल? 4 त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात;त्यांना लबाड बोलण्यास आवडते;ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात. 5 हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर;कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे. 6 तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे;तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही. 7 माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे;माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे. 8 अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा;त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा;देव आमच्यासाठी आश्रय आहे. 9 खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत;वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत. 10 दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका;आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका; 11 देव एकदा बोलला आहे,मी दोनदा ऐकले आहे,सामर्थ्य देवाचे आहे. 12 हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे.कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.