Psalms 65 (IRVM)
undefined दाविदाचे स्तोत्र 1 हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो;तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. 2 जो तू प्रार्थना ऐकतोस,त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. 3 दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे.आमचे अपराध तर तूच क्षमा करशील. 4 ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे,याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे.तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्याउत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. 5 हे आमच्या तारणाऱ्या देवा,जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचाआणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस,तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. 6 कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून,पर्वत दृढ केले आहेत. 7 तू गर्जणाऱ्या समुद्राला,त्यांच्या लाटांच्या गर्जनेलाआणि लोकांचा गलबला शांत करतो. 8 जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात;तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. 9 तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस;तू तिला फारच समृद्ध करतोस;देवाची नदी जलपूर्ण आहे;तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. 10 तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस;तू तिचे उंचवटे सपाट करतोस;तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस.तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस 11 तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस;तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. 12 रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतातआणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत. 13 कुरणांनी कळप पांघरले आहेत;दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत.ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.