1 Chronicles 6 (IRVM)
1 गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र. 2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र. 3 अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र. 4 एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा. 5 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. 6 उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला. 7 मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा. 8 अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास. 9 अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान. 10 योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता. 11 अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला. 12 अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम. 13 शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या. 14 अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला. 15 परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला. 16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र. 17 लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र. 18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र. 19 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे. 20 गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी.लिब्नीचा पुत्र यहथ.यहथया पुत्र जिम्मा. 21 जिम्माचा पुत्र यवाह.यवाहाचा इद्दो.इद्दोचा पुत्र जेरह.जेरहचा यात्राय. 22 कहाथाचे वंशज असे,कहाथचा पुत्र अम्मीनादाब.अम्मीनादाबचा कोरह.कोरहचा पुत्र अस्सीर. 23 अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर. 24 अस्सीरचा पुत्र तहथ,तहथचा पुत्र उरीएल.उरीएलचा उज्जीया.उज्जीयाचा शौल. 25 अमासय आणिअहीमोथ हे एलकानाचे पुत्र. 26 एलकानाचा पुत्र सोफय.सोफयचा पुत्र नहथ. 27 नहथचा पुत्र अलीयाब.अलीयाबाचा यरोहाम.यरोहामाचा एलकाना.एलकानाचा पुत्र शमुवेल. 28 थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र. 29 मरारीचे पुत्र,मरारीचा पुत्र महली.महलीचा लिब्नी.लिब्नीचा पुत्र शिमी.शिमीचा उज्जा. 30 उज्जाचा पुत्र शिमाशिमाचा हग्गीया आणित्याचा असाया. 31 कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली. 32 यरूशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत. 33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज,हेमान हा गवई.हा योएलाचा पुत्र.योएल शमुवेलचा पुत्र. 34 शमुवेल एलकानाचा पुत्र.एलकाना यरोहामाचा पुत्र.यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र. 35 तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र.एलकाना महथचा पुत्र.महथ अमासयाचा पुत्र. 36 अमासय एलकानाचा पुत्र.एलकाना योएलाचा पुत्र.योएल अजऱ्याचा पुत्र.अजऱ्या सफन्याचा पुत्र. 37 सफन्या तहथचा पुत्र.तहथ अस्सीरचा पुत्र.अस्सीर एब्यासाफचा पुत्र.एब्यासाफ कोरहचा पुत्र. 38 कोरह इसहारचा पुत्र.इसहार कहाथचा पुत्र.कहाथ लेवीचा आणिलेवी इस्राएलाचा पुत्र. 39 आसाफ हेमानाचा नातलग होता.हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे.आसाफ हा बरेख्या याचा पुत्र.बरेख्या शिमाचा पुत्र. 40 शिमा मीखाएलचा पुत्र.मिखाएल बासेया याचा पुत्र.बासेया मल्कीया याचा पुत्र. 41 मल्कीया एथनीचा पुत्र,एथनी जेरहचा पुत्रजेरह हा अदाया याचा पुत्र. 42 अदाया एतानाचा पुत्र.एथाना हा जिम्मा याचा पुत्र.जिम्मा शिमीचा पुत्र. 43 शिमी यहथ याचा पुत्र.यहथ हा गर्षोम याचा पुत्र.गर्षोम लेवीचा पुत्र. 44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र.किशी अब्दीचा पुत्र.अब्दी मल्लूखचा पुत्र. 45 मल्लूख हशब्याचा पुत्र.हशब्या अमस्याचा पुत्र.अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र. 46 हिल्कीया अमसीचा पुत्र.अमसी बानीचा पुत्र.बानी शेमर पुत्र. 47 शेमेर महलीचा पुत्र.महली मूशीचा पुत्र,मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र. 48 आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते. 49 अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत. 50 अहरोनाचे वंशज असे मोजले,अहरोनाचा पुत्र एलाजार.एलाजाराचा पुत्र फिनहास.फिनहासचा पुत्र अबीशूवा. 51 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या. 52 जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब. 53 अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास. 54 अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली. 55 यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली. 56 त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली. 57 अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा, 58 हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह. 59 आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. 60 बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली. 61 कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली. 62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली. 63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली. 64 ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली. 65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली. 66 एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली. 67 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण, 68 यकमाम, बेथ-होरोन, 69 अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. 70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली. 71 गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले. 72 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली. 73 रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह. 74 माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली. 75 हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली. 76 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली. 77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली. 78 यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट, 79 कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली. 80 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट; 81 हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.
In Other Versions
1 Chronicles 6 in the ANTPNG2D
1 Chronicles 6 in the BNTABOOT
1 Chronicles 6 in the BOHNTLTAL
1 Chronicles 6 in the BOILNTAP
1 Chronicles 6 in the KBT1ETNIK
1 Chronicles 6 in the TBIAOTANT