Psalms 141 (IRVM)
undefined दाविदाचे स्तोत्र 1 हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये.जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. 2 माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे,ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. 3 हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव;माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. 4 अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्यापापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस,जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. 5 नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल.तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल.माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही.परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. 6 त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे;ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. 7 जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते,तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. 8 तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत;मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. 9 त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून वदुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. 10 दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत,मी त्यातून निसटून जाईन.