Genesis 16 (IRVM)
1 अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते. 2 साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले. 3 अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली. 4 त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली. 5 नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.” 6 परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली. 7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. 8 देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” 9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.” 10 परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.” 11 परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे. 12 इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.” 13 नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?” 14 तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. 15 हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. 16 हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
In Other Versions
Genesis 16 in the ANGEFD
Genesis 16 in the ANTPNG2D
Genesis 16 in the AS21
Genesis 16 in the BAGH
Genesis 16 in the BBPNG
Genesis 16 in the BBT1E
Genesis 16 in the BDS
Genesis 16 in the BEV
Genesis 16 in the BHAD
Genesis 16 in the BIB
Genesis 16 in the BLPT
Genesis 16 in the BNT
Genesis 16 in the BNTABOOT
Genesis 16 in the BNTLV
Genesis 16 in the BOATCB
Genesis 16 in the BOATCB2
Genesis 16 in the BOBCV
Genesis 16 in the BOCNT
Genesis 16 in the BOECS
Genesis 16 in the BOGWICC
Genesis 16 in the BOHCB
Genesis 16 in the BOHCV
Genesis 16 in the BOHLNT
Genesis 16 in the BOHNTLTAL
Genesis 16 in the BOICB
Genesis 16 in the BOILNTAP
Genesis 16 in the BOITCV
Genesis 16 in the BOKCV
Genesis 16 in the BOKCV2
Genesis 16 in the BOKHWOG
Genesis 16 in the BOKSSV
Genesis 16 in the BOLCB
Genesis 16 in the BOLCB2
Genesis 16 in the BOMCV
Genesis 16 in the BONAV
Genesis 16 in the BONCB
Genesis 16 in the BONLT
Genesis 16 in the BONUT2
Genesis 16 in the BOPLNT
Genesis 16 in the BOSCB
Genesis 16 in the BOSNC
Genesis 16 in the BOTLNT
Genesis 16 in the BOVCB
Genesis 16 in the BOYCB
Genesis 16 in the BPBB
Genesis 16 in the BPH
Genesis 16 in the BSB
Genesis 16 in the CCB
Genesis 16 in the CUV
Genesis 16 in the CUVS
Genesis 16 in the DBT
Genesis 16 in the DGDNT
Genesis 16 in the DHNT
Genesis 16 in the DNT
Genesis 16 in the ELBE
Genesis 16 in the EMTV
Genesis 16 in the ESV
Genesis 16 in the FBV
Genesis 16 in the FEB
Genesis 16 in the GGMNT
Genesis 16 in the GNT
Genesis 16 in the HARY
Genesis 16 in the HNT
Genesis 16 in the IRVA
Genesis 16 in the IRVB
Genesis 16 in the IRVG
Genesis 16 in the IRVH
Genesis 16 in the IRVK
Genesis 16 in the IRVM2
Genesis 16 in the IRVO
Genesis 16 in the IRVP
Genesis 16 in the IRVT
Genesis 16 in the IRVT2
Genesis 16 in the IRVU
Genesis 16 in the ISVN
Genesis 16 in the JSNT
Genesis 16 in the KAPI
Genesis 16 in the KBT1ETNIK
Genesis 16 in the KBV
Genesis 16 in the KJV
Genesis 16 in the KNFD
Genesis 16 in the LBA
Genesis 16 in the LBLA
Genesis 16 in the LNT
Genesis 16 in the LSV
Genesis 16 in the MAAL
Genesis 16 in the MBV
Genesis 16 in the MBV2
Genesis 16 in the MHNT
Genesis 16 in the MKNFD
Genesis 16 in the MNG
Genesis 16 in the MNT
Genesis 16 in the MNT2
Genesis 16 in the MRS1T
Genesis 16 in the NAA
Genesis 16 in the NASB
Genesis 16 in the NBLA
Genesis 16 in the NBS
Genesis 16 in the NBVTP
Genesis 16 in the NET2
Genesis 16 in the NIV11
Genesis 16 in the NNT
Genesis 16 in the NNT2
Genesis 16 in the NNT3
Genesis 16 in the PDDPT
Genesis 16 in the PFNT
Genesis 16 in the RMNT
Genesis 16 in the SBIAS
Genesis 16 in the SBIBS
Genesis 16 in the SBIBS2
Genesis 16 in the SBICS
Genesis 16 in the SBIDS
Genesis 16 in the SBIGS
Genesis 16 in the SBIHS
Genesis 16 in the SBIIS
Genesis 16 in the SBIIS2
Genesis 16 in the SBIIS3
Genesis 16 in the SBIKS
Genesis 16 in the SBIKS2
Genesis 16 in the SBIMS
Genesis 16 in the SBIOS
Genesis 16 in the SBIPS
Genesis 16 in the SBISS
Genesis 16 in the SBITS
Genesis 16 in the SBITS2
Genesis 16 in the SBITS3
Genesis 16 in the SBITS4
Genesis 16 in the SBIUS
Genesis 16 in the SBIVS
Genesis 16 in the SBT
Genesis 16 in the SBT1E
Genesis 16 in the SCHL
Genesis 16 in the SNT
Genesis 16 in the SUSU
Genesis 16 in the SUSU2
Genesis 16 in the SYNO
Genesis 16 in the TBIAOTANT
Genesis 16 in the TBT1E
Genesis 16 in the TBT1E2
Genesis 16 in the TFTIP
Genesis 16 in the TFTU
Genesis 16 in the TGNTATF3T
Genesis 16 in the THAI
Genesis 16 in the TNFD
Genesis 16 in the TNT
Genesis 16 in the TNTIK
Genesis 16 in the TNTIL
Genesis 16 in the TNTIN
Genesis 16 in the TNTIP
Genesis 16 in the TNTIZ
Genesis 16 in the TOMA
Genesis 16 in the TTENT
Genesis 16 in the UBG
Genesis 16 in the UGV
Genesis 16 in the UGV2
Genesis 16 in the UGV3
Genesis 16 in the VBL
Genesis 16 in the VDCC
Genesis 16 in the YALU
Genesis 16 in the YAPE
Genesis 16 in the YBVTP
Genesis 16 in the ZBP