Jeremiah 47 (IRVM)
1 यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले. 2 परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, उत्तरेला पुराचे पाणी चढत आहे. ते तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे होत आहे!मग देश व त्यातील सर्वकाही, नगरे आणि त्यातील रहिवासी यांना ते बुडवून टाकतील. म्हणून प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करतील,आणि त्या देशात राहणारे सर्व विलाप करतील. 3 त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे,त्यांच्या रथांचा गडगडाट व त्यांच्या चाकांचा खडखडाट,आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत. 4 कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतूनवाचलेला प्रत्येक जो कोणी त्यांचे सहाय्य करणारा त्याचा नाश होईल.कारण परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोराच्या द्विपातील वाचलेल्यांचाही नाश करणार आहे. 5 गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत:ला जखमा करून घेणार? 6 हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार?तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा. 7 तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे.त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.”