1 Chronicles 26 (IRVM)
1 द्वारपालांचे गट:हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या. 2 मेशेलेम्या याला पुत्र होते. जखऱ्या हा त्यातला मोठा. यदीएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा 3 एलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा. 4 ओबेद-अदोम, याची अपत्ये. शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा, 5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमावर खरोखच कृपादृष्टी होती. 6 शमाया हा ओबेद-अदोमाचा पुत्र. त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती. 7 अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते. 8 हे सर्व ओबेद-अदोमाचे वंशज त्याची अपत्ये, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवासमंडपाच्या सेवेत बलवान व पराक्रमी होते. ओबेद-अदोमाचे एकंदर बासष्ट वंशज होते. 9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते. 10 मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते. 11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून तेराजण होते. 12 यांना द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते. 13 एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यामध्ये वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता. 14 शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली. 15 ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले. 16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते. 17 पूर्वेला सहा लेवी, उत्तरेला प्रतिदिनी चार, दक्षिणेला प्रतिदिनी चार आणि भांडाराच्या रक्षणासाठी दोन जोड्या होत्या. 18 पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत. 19 हे व्दारपालांचे वर्ग होते. कोरहाचे वंशज आणि मरारीरीचे वंशज यांनी ते भरले होते. 20 देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातला अहीया हा प्रमुख होता. 21 लादान हा गेर्षोनाच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता. 22 जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते. 23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांतूनसुध्दा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. 24 मोशेचा पुत्र गेर्षोम, याचा पुत्र शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा नायक होता. 25 अलियेजराकडून त्याचे भाऊबंद: अलियेजाराचा पुत्र हा रहब्या होता.रहब्याचा पुत्र यशया.यशयाचा पुत्र योराम.योरामाचा पुत्र जिख्री. आणिजिख्रीचा पुत्र शलोमोथ. 26 दावीद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते. 27 युध्दात मिळालेल्या काही लूटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली. 28 शमुवेल संदेष्टा, कीशचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुवेचा पुत्र यवाब यांनी परमेश्वरास समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत. 29 इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची अपत्ये इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते. 30 हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते. 31 हेब्रोनी यांच्या वंशातला यरीया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता, त्याच्या घराण्यावरुन त्याची मोजणी केली. दावीदाच्या राज्याच्या कारकिर्दीच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली. 32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यासाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.
In Other Versions
1 Chronicles 26 in the ANTPNG2D
1 Chronicles 26 in the BNTABOOT
1 Chronicles 26 in the BOATCB2
1 Chronicles 26 in the BOGWICC
1 Chronicles 26 in the BOHNTLTAL
1 Chronicles 26 in the BOILNTAP
1 Chronicles 26 in the BOKHWOG
1 Chronicles 26 in the KBT1ETNIK
1 Chronicles 26 in the TBIAOTANT