Hosea 11 (IRVM)
1 जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले,आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले. 2 त्यांना जेवढे बोलविले तेवढेते माझ्यापासून दूर जातते बआलास बलीआणि मुर्तीस धूप जाळत. 3 तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविलेतो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केलेपण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो. 4 मी त्यांना मानवताआणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतोमी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतोआणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले. 5 ते मिसरात परत येणार काय?अश्शूर त्यावर राज्य करणार काय?कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात? 6 त्यांच्या नगरावर तलवार चालेलआणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील,त्यांचा नाश त्यांच्या स्वत:च्या योजनांमुळे होईल. 7 माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहेतरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहेत्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही. 8 हे एफ्राईमे,मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला,मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ?मी तुला अदमासारखे कसे करु?मी तुला सबोयिमासारखे कसे करु?माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे. 9 मी माझा भयानक राग अमलातआणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणारनाही कारण मी देव आहेआणि मनुष्य नाहीतुमच्यामध्ये असणारामी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही. 10 ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वरसिंहासारखी गर्जना करेनमी खरोखर गर्जेनआणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील. 11 ते मिसरातून पक्षासारखेआणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतीलमी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो. 12 एफ्राईम मला लबाडीनेआणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले,पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर,जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.