Psalms 61 (IRVM)
undefined दाविदाचे स्तोत्र 1 हे देवा, माझी आरोळी ऐक;माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. 2 जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन;माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने. 3 कारण तू माझ्यासाठी आश्रय,माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. 4 मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन;मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन. 5 कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस;जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. 6 तू राजाचे आयुष्य वाढव;त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. 7 मी देवासमोर सर्वकाळ राहो;तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. 8 मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन,म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.