2 Kings 20 (IRVM)

1 याच सुमारास हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार, वाचणार नाहीस.” 2 तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला. 3 “परमेश्वरा, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” तेव्हा हिज्कीया फार रडला. 4 यशया मधला चौक ओलांडून शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा त्यास परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, 5 “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल.” त्यास म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील. 6 तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वत:साठी तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.” 7 मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करून हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला. 8 हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन याबद्दल काही खूण देता येईल का?” 9 यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ किंवा मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.” 10 हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसे नको, ती दहा पावले मागे यावी.” 11 मग यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने आहाजाची सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली. 12 यावेळी बलदानचा मुलगा बरोदख-बलदान हा बाबेलचा राजा होता. त्याने हिज्कीयाकडे पत्रे आणि भेटवस्तू पाठवल्या. हिज्कीया आजारी असल्याचे त्याने ऐकले होते. 13 हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या मनुष्यांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही. 14 तेव्हा यशया संदेष्टा राजाकडे येऊन म्हणाला, “हे लोक कोण? त्यांचे काय म्हणणे आहे?” हिज्कीया म्हणाला, “हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलमधून आले आहेत.” 15 यशयाने विचारले, “त्यांनी या घरातले काय काय पाहिले?” हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.” 16 तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक. 17 तुझ्या घरातील सर्व चीजवस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आत्ता बाबेलला नेण्यात येईल. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. काही म्हणता काही मागे उरणार नाही. ही परमेश्वराची वाणी आहे. 18 बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील.” 19 तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे.” तो पुढे म्हणाला, “निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना?” 20 शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. 21 हिज्कीया निधन पावला आणि त्याचा पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.

In Other Versions

2 Kings 20 in the ANGEFD

2 Kings 20 in the ANTPNG2D

2 Kings 20 in the AS21

2 Kings 20 in the BAGH

2 Kings 20 in the BBPNG

2 Kings 20 in the BBT1E

2 Kings 20 in the BDS

2 Kings 20 in the BEV

2 Kings 20 in the BHAD

2 Kings 20 in the BIB

2 Kings 20 in the BLPT

2 Kings 20 in the BNT

2 Kings 20 in the BNTABOOT

2 Kings 20 in the BNTLV

2 Kings 20 in the BOATCB

2 Kings 20 in the BOATCB2

2 Kings 20 in the BOBCV

2 Kings 20 in the BOCNT

2 Kings 20 in the BOECS

2 Kings 20 in the BOGWICC

2 Kings 20 in the BOHCB

2 Kings 20 in the BOHCV

2 Kings 20 in the BOHLNT

2 Kings 20 in the BOHNTLTAL

2 Kings 20 in the BOICB

2 Kings 20 in the BOILNTAP

2 Kings 20 in the BOITCV

2 Kings 20 in the BOKCV

2 Kings 20 in the BOKCV2

2 Kings 20 in the BOKHWOG

2 Kings 20 in the BOKSSV

2 Kings 20 in the BOLCB

2 Kings 20 in the BOLCB2

2 Kings 20 in the BOMCV

2 Kings 20 in the BONAV

2 Kings 20 in the BONCB

2 Kings 20 in the BONLT

2 Kings 20 in the BONUT2

2 Kings 20 in the BOPLNT

2 Kings 20 in the BOSCB

2 Kings 20 in the BOSNC

2 Kings 20 in the BOTLNT

2 Kings 20 in the BOVCB

2 Kings 20 in the BOYCB

2 Kings 20 in the BPBB

2 Kings 20 in the BPH

2 Kings 20 in the BSB

2 Kings 20 in the CCB

2 Kings 20 in the CUV

2 Kings 20 in the CUVS

2 Kings 20 in the DBT

2 Kings 20 in the DGDNT

2 Kings 20 in the DHNT

2 Kings 20 in the DNT

2 Kings 20 in the ELBE

2 Kings 20 in the EMTV

2 Kings 20 in the ESV

2 Kings 20 in the FBV

2 Kings 20 in the FEB

2 Kings 20 in the GGMNT

2 Kings 20 in the GNT

2 Kings 20 in the HARY

2 Kings 20 in the HNT

2 Kings 20 in the IRVA

2 Kings 20 in the IRVB

2 Kings 20 in the IRVG

2 Kings 20 in the IRVH

2 Kings 20 in the IRVK

2 Kings 20 in the IRVM2

2 Kings 20 in the IRVO

2 Kings 20 in the IRVP

2 Kings 20 in the IRVT

2 Kings 20 in the IRVT2

2 Kings 20 in the IRVU

2 Kings 20 in the ISVN

2 Kings 20 in the JSNT

2 Kings 20 in the KAPI

2 Kings 20 in the KBT1ETNIK

2 Kings 20 in the KBV

2 Kings 20 in the KJV

2 Kings 20 in the KNFD

2 Kings 20 in the LBA

2 Kings 20 in the LBLA

2 Kings 20 in the LNT

2 Kings 20 in the LSV

2 Kings 20 in the MAAL

2 Kings 20 in the MBV

2 Kings 20 in the MBV2

2 Kings 20 in the MHNT

2 Kings 20 in the MKNFD

2 Kings 20 in the MNG

2 Kings 20 in the MNT

2 Kings 20 in the MNT2

2 Kings 20 in the MRS1T

2 Kings 20 in the NAA

2 Kings 20 in the NASB

2 Kings 20 in the NBLA

2 Kings 20 in the NBS

2 Kings 20 in the NBVTP

2 Kings 20 in the NET2

2 Kings 20 in the NIV11

2 Kings 20 in the NNT

2 Kings 20 in the NNT2

2 Kings 20 in the NNT3

2 Kings 20 in the PDDPT

2 Kings 20 in the PFNT

2 Kings 20 in the RMNT

2 Kings 20 in the SBIAS

2 Kings 20 in the SBIBS

2 Kings 20 in the SBIBS2

2 Kings 20 in the SBICS

2 Kings 20 in the SBIDS

2 Kings 20 in the SBIGS

2 Kings 20 in the SBIHS

2 Kings 20 in the SBIIS

2 Kings 20 in the SBIIS2

2 Kings 20 in the SBIIS3

2 Kings 20 in the SBIKS

2 Kings 20 in the SBIKS2

2 Kings 20 in the SBIMS

2 Kings 20 in the SBIOS

2 Kings 20 in the SBIPS

2 Kings 20 in the SBISS

2 Kings 20 in the SBITS

2 Kings 20 in the SBITS2

2 Kings 20 in the SBITS3

2 Kings 20 in the SBITS4

2 Kings 20 in the SBIUS

2 Kings 20 in the SBIVS

2 Kings 20 in the SBT

2 Kings 20 in the SBT1E

2 Kings 20 in the SCHL

2 Kings 20 in the SNT

2 Kings 20 in the SUSU

2 Kings 20 in the SUSU2

2 Kings 20 in the SYNO

2 Kings 20 in the TBIAOTANT

2 Kings 20 in the TBT1E

2 Kings 20 in the TBT1E2

2 Kings 20 in the TFTIP

2 Kings 20 in the TFTU

2 Kings 20 in the TGNTATF3T

2 Kings 20 in the THAI

2 Kings 20 in the TNFD

2 Kings 20 in the TNT

2 Kings 20 in the TNTIK

2 Kings 20 in the TNTIL

2 Kings 20 in the TNTIN

2 Kings 20 in the TNTIP

2 Kings 20 in the TNTIZ

2 Kings 20 in the TOMA

2 Kings 20 in the TTENT

2 Kings 20 in the UBG

2 Kings 20 in the UGV

2 Kings 20 in the UGV2

2 Kings 20 in the UGV3

2 Kings 20 in the VBL

2 Kings 20 in the VDCC

2 Kings 20 in the YALU

2 Kings 20 in the YAPE

2 Kings 20 in the YBVTP

2 Kings 20 in the ZBP