2 Kings 22 (IRVM)

1 योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकाथमधील अदाया याची मुलगी. 2 योशीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले. 3 मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस, याला योशीया राजाने कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले. 4 “तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे. 5 परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा. 6 सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत. 7 पण त्यांना दिलेल्या पैशाचा हिशोब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.” 8 महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले. 9 शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करून तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.” 10 पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले. 11 नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अति दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली. 12 मग राजाने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की, 13 “आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्यास या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत. 14 मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती पत्नी. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरूशलेमामध्ये दुसऱ्या भागात राहत होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.” 15 तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हास माझ्याकडे ज्याने पाठवले त्यास सांगा, 16 “परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील.” 17 यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला, त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्नीसारखा माझा संताप असेल. 18 “यहूदाचा राजा योशीया याने तुम्हास परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. 19 तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरूशलेमेवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.” हे परमेश्वराचे शब्द आहेत. 20 “ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करून देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरूशलेमेवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.” मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.

In Other Versions

2 Kings 22 in the ANGEFD

2 Kings 22 in the ANTPNG2D

2 Kings 22 in the AS21

2 Kings 22 in the BAGH

2 Kings 22 in the BBPNG

2 Kings 22 in the BBT1E

2 Kings 22 in the BDS

2 Kings 22 in the BEV

2 Kings 22 in the BHAD

2 Kings 22 in the BIB

2 Kings 22 in the BLPT

2 Kings 22 in the BNT

2 Kings 22 in the BNTABOOT

2 Kings 22 in the BNTLV

2 Kings 22 in the BOATCB

2 Kings 22 in the BOATCB2

2 Kings 22 in the BOBCV

2 Kings 22 in the BOCNT

2 Kings 22 in the BOECS

2 Kings 22 in the BOGWICC

2 Kings 22 in the BOHCB

2 Kings 22 in the BOHCV

2 Kings 22 in the BOHLNT

2 Kings 22 in the BOHNTLTAL

2 Kings 22 in the BOICB

2 Kings 22 in the BOILNTAP

2 Kings 22 in the BOITCV

2 Kings 22 in the BOKCV

2 Kings 22 in the BOKCV2

2 Kings 22 in the BOKHWOG

2 Kings 22 in the BOKSSV

2 Kings 22 in the BOLCB

2 Kings 22 in the BOLCB2

2 Kings 22 in the BOMCV

2 Kings 22 in the BONAV

2 Kings 22 in the BONCB

2 Kings 22 in the BONLT

2 Kings 22 in the BONUT2

2 Kings 22 in the BOPLNT

2 Kings 22 in the BOSCB

2 Kings 22 in the BOSNC

2 Kings 22 in the BOTLNT

2 Kings 22 in the BOVCB

2 Kings 22 in the BOYCB

2 Kings 22 in the BPBB

2 Kings 22 in the BPH

2 Kings 22 in the BSB

2 Kings 22 in the CCB

2 Kings 22 in the CUV

2 Kings 22 in the CUVS

2 Kings 22 in the DBT

2 Kings 22 in the DGDNT

2 Kings 22 in the DHNT

2 Kings 22 in the DNT

2 Kings 22 in the ELBE

2 Kings 22 in the EMTV

2 Kings 22 in the ESV

2 Kings 22 in the FBV

2 Kings 22 in the FEB

2 Kings 22 in the GGMNT

2 Kings 22 in the GNT

2 Kings 22 in the HARY

2 Kings 22 in the HNT

2 Kings 22 in the IRVA

2 Kings 22 in the IRVB

2 Kings 22 in the IRVG

2 Kings 22 in the IRVH

2 Kings 22 in the IRVK

2 Kings 22 in the IRVM2

2 Kings 22 in the IRVO

2 Kings 22 in the IRVP

2 Kings 22 in the IRVT

2 Kings 22 in the IRVT2

2 Kings 22 in the IRVU

2 Kings 22 in the ISVN

2 Kings 22 in the JSNT

2 Kings 22 in the KAPI

2 Kings 22 in the KBT1ETNIK

2 Kings 22 in the KBV

2 Kings 22 in the KJV

2 Kings 22 in the KNFD

2 Kings 22 in the LBA

2 Kings 22 in the LBLA

2 Kings 22 in the LNT

2 Kings 22 in the LSV

2 Kings 22 in the MAAL

2 Kings 22 in the MBV

2 Kings 22 in the MBV2

2 Kings 22 in the MHNT

2 Kings 22 in the MKNFD

2 Kings 22 in the MNG

2 Kings 22 in the MNT

2 Kings 22 in the MNT2

2 Kings 22 in the MRS1T

2 Kings 22 in the NAA

2 Kings 22 in the NASB

2 Kings 22 in the NBLA

2 Kings 22 in the NBS

2 Kings 22 in the NBVTP

2 Kings 22 in the NET2

2 Kings 22 in the NIV11

2 Kings 22 in the NNT

2 Kings 22 in the NNT2

2 Kings 22 in the NNT3

2 Kings 22 in the PDDPT

2 Kings 22 in the PFNT

2 Kings 22 in the RMNT

2 Kings 22 in the SBIAS

2 Kings 22 in the SBIBS

2 Kings 22 in the SBIBS2

2 Kings 22 in the SBICS

2 Kings 22 in the SBIDS

2 Kings 22 in the SBIGS

2 Kings 22 in the SBIHS

2 Kings 22 in the SBIIS

2 Kings 22 in the SBIIS2

2 Kings 22 in the SBIIS3

2 Kings 22 in the SBIKS

2 Kings 22 in the SBIKS2

2 Kings 22 in the SBIMS

2 Kings 22 in the SBIOS

2 Kings 22 in the SBIPS

2 Kings 22 in the SBISS

2 Kings 22 in the SBITS

2 Kings 22 in the SBITS2

2 Kings 22 in the SBITS3

2 Kings 22 in the SBITS4

2 Kings 22 in the SBIUS

2 Kings 22 in the SBIVS

2 Kings 22 in the SBT

2 Kings 22 in the SBT1E

2 Kings 22 in the SCHL

2 Kings 22 in the SNT

2 Kings 22 in the SUSU

2 Kings 22 in the SUSU2

2 Kings 22 in the SYNO

2 Kings 22 in the TBIAOTANT

2 Kings 22 in the TBT1E

2 Kings 22 in the TBT1E2

2 Kings 22 in the TFTIP

2 Kings 22 in the TFTU

2 Kings 22 in the TGNTATF3T

2 Kings 22 in the THAI

2 Kings 22 in the TNFD

2 Kings 22 in the TNT

2 Kings 22 in the TNTIK

2 Kings 22 in the TNTIL

2 Kings 22 in the TNTIN

2 Kings 22 in the TNTIP

2 Kings 22 in the TNTIZ

2 Kings 22 in the TOMA

2 Kings 22 in the TTENT

2 Kings 22 in the UBG

2 Kings 22 in the UGV

2 Kings 22 in the UGV2

2 Kings 22 in the UGV3

2 Kings 22 in the VBL

2 Kings 22 in the VDCC

2 Kings 22 in the YALU

2 Kings 22 in the YAPE

2 Kings 22 in the YBVTP

2 Kings 22 in the ZBP