Deuteronomy 19 (IRVM)

1 तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांची भूमी तुला देत आहे, त्या राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यांच्या प्रदेशाचा तू ताबा घेतल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल, 2 तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यामध्ये तीन नगरे तुम्ही राखून ठेवा. 3 म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्यास तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो प्रदेश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्या देशाचे तू तीन भाग कर. 4 मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे. 5 उदाहरणार्थ, एखादा मनुष्य लाकडे तोडायला त्याच्या शेजाऱ्याबरोबर जंगलात गेला. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नक्की दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने यापैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे. 6 हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता. 7 म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत:साठी राखून ठेव. 8 तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हास देईल. 9 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रीती करा व त्याने दाखवलेल्या मार्गात नियमीत चालत जा. मी दिलेल्या या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा. 10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या भूमीवर निर्दोष मनुष्यांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हास लागणार नाही. 11 पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला. 12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्यास तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्यास मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे. 13 त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल. 14 शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत. 15 एखाद्याने काही गुन्हा किंवा अपराध केला तर, अपराधाचा आरोप कोणावर असेल तर त्यास दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच. 16 अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो. 17 अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे. 18 मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला, 19 तर मग तुम्ही त्यास तीच शिक्षा करावी जी त्यास आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा 20 हे ऐकून इतरांना भीती वाटेल आणि तेथून पुढे तुमच्यामध्ये असे वाईट घडणार नाही. 21 तू दया दाखवू नये. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहान्ताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.

In Other Versions

Deuteronomy 19 in the ANGEFD

Deuteronomy 19 in the ANTPNG2D

Deuteronomy 19 in the AS21

Deuteronomy 19 in the BAGH

Deuteronomy 19 in the BBPNG

Deuteronomy 19 in the BBT1E

Deuteronomy 19 in the BDS

Deuteronomy 19 in the BEV

Deuteronomy 19 in the BHAD

Deuteronomy 19 in the BIB

Deuteronomy 19 in the BLPT

Deuteronomy 19 in the BNT

Deuteronomy 19 in the BNTABOOT

Deuteronomy 19 in the BNTLV

Deuteronomy 19 in the BOATCB

Deuteronomy 19 in the BOATCB2

Deuteronomy 19 in the BOBCV

Deuteronomy 19 in the BOCNT

Deuteronomy 19 in the BOECS

Deuteronomy 19 in the BOGWICC

Deuteronomy 19 in the BOHCB

Deuteronomy 19 in the BOHCV

Deuteronomy 19 in the BOHLNT

Deuteronomy 19 in the BOHNTLTAL

Deuteronomy 19 in the BOICB

Deuteronomy 19 in the BOILNTAP

Deuteronomy 19 in the BOITCV

Deuteronomy 19 in the BOKCV

Deuteronomy 19 in the BOKCV2

Deuteronomy 19 in the BOKHWOG

Deuteronomy 19 in the BOKSSV

Deuteronomy 19 in the BOLCB

Deuteronomy 19 in the BOLCB2

Deuteronomy 19 in the BOMCV

Deuteronomy 19 in the BONAV

Deuteronomy 19 in the BONCB

Deuteronomy 19 in the BONLT

Deuteronomy 19 in the BONUT2

Deuteronomy 19 in the BOPLNT

Deuteronomy 19 in the BOSCB

Deuteronomy 19 in the BOSNC

Deuteronomy 19 in the BOTLNT

Deuteronomy 19 in the BOVCB

Deuteronomy 19 in the BOYCB

Deuteronomy 19 in the BPBB

Deuteronomy 19 in the BPH

Deuteronomy 19 in the BSB

Deuteronomy 19 in the CCB

Deuteronomy 19 in the CUV

Deuteronomy 19 in the CUVS

Deuteronomy 19 in the DBT

Deuteronomy 19 in the DGDNT

Deuteronomy 19 in the DHNT

Deuteronomy 19 in the DNT

Deuteronomy 19 in the ELBE

Deuteronomy 19 in the EMTV

Deuteronomy 19 in the ESV

Deuteronomy 19 in the FBV

Deuteronomy 19 in the FEB

Deuteronomy 19 in the GGMNT

Deuteronomy 19 in the GNT

Deuteronomy 19 in the HARY

Deuteronomy 19 in the HNT

Deuteronomy 19 in the IRVA

Deuteronomy 19 in the IRVB

Deuteronomy 19 in the IRVG

Deuteronomy 19 in the IRVH

Deuteronomy 19 in the IRVK

Deuteronomy 19 in the IRVM2

Deuteronomy 19 in the IRVO

Deuteronomy 19 in the IRVP

Deuteronomy 19 in the IRVT

Deuteronomy 19 in the IRVT2

Deuteronomy 19 in the IRVU

Deuteronomy 19 in the ISVN

Deuteronomy 19 in the JSNT

Deuteronomy 19 in the KAPI

Deuteronomy 19 in the KBT1ETNIK

Deuteronomy 19 in the KBV

Deuteronomy 19 in the KJV

Deuteronomy 19 in the KNFD

Deuteronomy 19 in the LBA

Deuteronomy 19 in the LBLA

Deuteronomy 19 in the LNT

Deuteronomy 19 in the LSV

Deuteronomy 19 in the MAAL

Deuteronomy 19 in the MBV

Deuteronomy 19 in the MBV2

Deuteronomy 19 in the MHNT

Deuteronomy 19 in the MKNFD

Deuteronomy 19 in the MNG

Deuteronomy 19 in the MNT

Deuteronomy 19 in the MNT2

Deuteronomy 19 in the MRS1T

Deuteronomy 19 in the NAA

Deuteronomy 19 in the NASB

Deuteronomy 19 in the NBLA

Deuteronomy 19 in the NBS

Deuteronomy 19 in the NBVTP

Deuteronomy 19 in the NET2

Deuteronomy 19 in the NIV11

Deuteronomy 19 in the NNT

Deuteronomy 19 in the NNT2

Deuteronomy 19 in the NNT3

Deuteronomy 19 in the PDDPT

Deuteronomy 19 in the PFNT

Deuteronomy 19 in the RMNT

Deuteronomy 19 in the SBIAS

Deuteronomy 19 in the SBIBS

Deuteronomy 19 in the SBIBS2

Deuteronomy 19 in the SBICS

Deuteronomy 19 in the SBIDS

Deuteronomy 19 in the SBIGS

Deuteronomy 19 in the SBIHS

Deuteronomy 19 in the SBIIS

Deuteronomy 19 in the SBIIS2

Deuteronomy 19 in the SBIIS3

Deuteronomy 19 in the SBIKS

Deuteronomy 19 in the SBIKS2

Deuteronomy 19 in the SBIMS

Deuteronomy 19 in the SBIOS

Deuteronomy 19 in the SBIPS

Deuteronomy 19 in the SBISS

Deuteronomy 19 in the SBITS

Deuteronomy 19 in the SBITS2

Deuteronomy 19 in the SBITS3

Deuteronomy 19 in the SBITS4

Deuteronomy 19 in the SBIUS

Deuteronomy 19 in the SBIVS

Deuteronomy 19 in the SBT

Deuteronomy 19 in the SBT1E

Deuteronomy 19 in the SCHL

Deuteronomy 19 in the SNT

Deuteronomy 19 in the SUSU

Deuteronomy 19 in the SUSU2

Deuteronomy 19 in the SYNO

Deuteronomy 19 in the TBIAOTANT

Deuteronomy 19 in the TBT1E

Deuteronomy 19 in the TBT1E2

Deuteronomy 19 in the TFTIP

Deuteronomy 19 in the TFTU

Deuteronomy 19 in the TGNTATF3T

Deuteronomy 19 in the THAI

Deuteronomy 19 in the TNFD

Deuteronomy 19 in the TNT

Deuteronomy 19 in the TNTIK

Deuteronomy 19 in the TNTIL

Deuteronomy 19 in the TNTIN

Deuteronomy 19 in the TNTIP

Deuteronomy 19 in the TNTIZ

Deuteronomy 19 in the TOMA

Deuteronomy 19 in the TTENT

Deuteronomy 19 in the UBG

Deuteronomy 19 in the UGV

Deuteronomy 19 in the UGV2

Deuteronomy 19 in the UGV3

Deuteronomy 19 in the VBL

Deuteronomy 19 in the VDCC

Deuteronomy 19 in the YALU

Deuteronomy 19 in the YAPE

Deuteronomy 19 in the YBVTP

Deuteronomy 19 in the ZBP