Ezekiel 11 (IRVM)

1 नंतर परमेश्वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे देवाच्या आत्म्याने मला उचलून नेले. आणि पहा! प्रवेशद्वाराजवळ मी पंचवीस माणसे उभी असलेली पाहिली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा याजन्या आणि पलट्या मुलगा बनाया, हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते. 2 परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, हे लोक पापाची योजना करणारे आहेत, आणि हे शहरात दुष्ट योजना योजीतात. 3 ते म्हणतात, ‘घरे बांधण्याचा समय अजून जवळ आला नाही, हे शहर भांडे आहे, आणि आपण मांस आहोत.’ 4 म्हणून मानवाच्या मुला त्यांच्या विरोधात भविष्यवाणी कर.” 5 त्यानंतर परमेश्वर देवाचा आत्मा माझ्यावर आला आणि तो मला म्हणाला परमेश्वर देव असे सांगतो असे म्हण, तू असे इस्राएलाच्या घराण्यास सांगितल्यास त्यांच्या मनात आलेले विचार मी ओळखतो. 6 शहरात, रस्त्यावर मारलेल्या लोकांस, दुप्पट करा आणि रस्त्ये त्यांनी भरुन टाका. 7 म्हणून परमेश्वर देव म्हणतो, ज्या लोकांस तुम्ही मारले त्यांची प्रेते यरूशलेम शहराच्या मध्यभागी ठेवलेली आहेत, हे शहर भांडे आणि ते मांस आहेत, पण तुम्ही त्यांना शहराच्या मध्य भागातून घेऊन यायचे आहे. 8 तुम्ही तलवारीला घाबरला, तर मी तलवार तुम्हावर आणिन, हे परमेश्वर देवाचा जाहीर नामा आहे 9 मी तुम्हास शहराच्या मध्य भागातून घेऊन येईन आणि परदेशांच्या मस्तकावर तुम्हास ठेवीन, कारण त्यांच्या विरुध्द न्याय करेन. 10 त्यांचा पाडाव मी तलवारीने करेन. इस्राएलाच्या वेशीत त्याचा न्याय करेन मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे. 11 हे शहर तुमचे अन्न शिजवण्याचे भांडे होणार नाही. त्यांच्यामध्ये ते मांसही होणार नाही. मी इस्राएलाच्या वेशीच्या आत तुमचा न्याय निवाडा करणार आहे. 12 मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, जो कोणी मूर्ती पुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरवीले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी, सभोवतालच्या राष्ट्राचे निर्णय तुम्ही घेऊन जाल. 13 मी केलेल्या भाकीतानुसार बाहेर ये, पलट्याचा मुलगा बनाया मरण पावला. मग मी पालथा पडून मोठ्या आवाजाने म्हणालो, “आहा! हे प्रभू परमेश्वर देवा तू उरलेल्या इस्राएलाच्या लोकांस पूर्ण शेवट केलास काय?” 14 परमेश्वर देवाचा शब्द मला कळला, व मला म्हणाला, 15 “मानवाच्या मुला, जे यरूशलेमनिवासी, तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, इस्राएल घराण्यातील प्रत्येक मानवाचे वंशज. जे सांगतात इस्राएल देश आम्हास मिळाला आहे, ते परमेश्वर देवापासून लांब आहेत, ही भूमी आम्हास वतन म्हणून दिलेली आहे. 16 म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, मी त्यांना देशातून फार लांब बाहेर नेईन, त्यांना विखुरलेले असे सर्व भूमीत करीन, तरी मी काहीकाळ त्यांच्यासाठी पवित्र ठिकाण असे करीन जेथे ते जाणार आहे. 17 म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, जेथून तुम्ही विखुरले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हास एकत्र करीन आणि मी इस्राएल देश तुम्हास देईन. 18 मग ते तेथील सर्व तिरस्कार आणणाऱ्या व ओंगळ व घृणास्पद त्या ठिकाणाहून काढून टाकेल. 19 आणि मी तुम्हास एक मन देईन, आणि मी तुम्हात नवीन आत्मा घालीन जेव्हा ते माझ्या जवळ येतील, त्यांच्यातील दगडरुपी मन काढून त्यांना नवे मांसमय मन देईन. 20 मग मी ठरवेन तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. तर ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. 21 पण जे कोणी ओंगाळ गोष्टीच्या प्रेमाकडे आणि घृणास्पद कार्य करेल मी त्यांचे वर्तणुक त्यांच्या माथी आणिन. मी परमेश्वर देव आहे असे जाहीर करतो.” 22 तेव्हा करुबांनी आपल्या पंखांनी वर उचलून घेतले आणि चाके त्यांच्या बाजूला होती आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव हे सर्वोच्च होते. 23 शहराच्या मध्य भागातून परमेश्वर देवाचे गौरव वर निघून गेले, आणि शहराच्या पूर्व भागात पर्वतावर स्थिर उभे राहीले. 24 आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले व खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले. 25 मग मी हद्दपार असलेल्यांना सर्व काही जाहीर केले जे परमेश्वर देवाने मला सांगितले होते.

In Other Versions

Ezekiel 11 in the ANGEFD

Ezekiel 11 in the ANTPNG2D

Ezekiel 11 in the AS21

Ezekiel 11 in the BAGH

Ezekiel 11 in the BBPNG

Ezekiel 11 in the BBT1E

Ezekiel 11 in the BDS

Ezekiel 11 in the BEV

Ezekiel 11 in the BHAD

Ezekiel 11 in the BIB

Ezekiel 11 in the BLPT

Ezekiel 11 in the BNT

Ezekiel 11 in the BNTABOOT

Ezekiel 11 in the BNTLV

Ezekiel 11 in the BOATCB

Ezekiel 11 in the BOATCB2

Ezekiel 11 in the BOBCV

Ezekiel 11 in the BOCNT

Ezekiel 11 in the BOECS

Ezekiel 11 in the BOGWICC

Ezekiel 11 in the BOHCB

Ezekiel 11 in the BOHCV

Ezekiel 11 in the BOHLNT

Ezekiel 11 in the BOHNTLTAL

Ezekiel 11 in the BOICB

Ezekiel 11 in the BOILNTAP

Ezekiel 11 in the BOITCV

Ezekiel 11 in the BOKCV

Ezekiel 11 in the BOKCV2

Ezekiel 11 in the BOKHWOG

Ezekiel 11 in the BOKSSV

Ezekiel 11 in the BOLCB

Ezekiel 11 in the BOLCB2

Ezekiel 11 in the BOMCV

Ezekiel 11 in the BONAV

Ezekiel 11 in the BONCB

Ezekiel 11 in the BONLT

Ezekiel 11 in the BONUT2

Ezekiel 11 in the BOPLNT

Ezekiel 11 in the BOSCB

Ezekiel 11 in the BOSNC

Ezekiel 11 in the BOTLNT

Ezekiel 11 in the BOVCB

Ezekiel 11 in the BOYCB

Ezekiel 11 in the BPBB

Ezekiel 11 in the BPH

Ezekiel 11 in the BSB

Ezekiel 11 in the CCB

Ezekiel 11 in the CUV

Ezekiel 11 in the CUVS

Ezekiel 11 in the DBT

Ezekiel 11 in the DGDNT

Ezekiel 11 in the DHNT

Ezekiel 11 in the DNT

Ezekiel 11 in the ELBE

Ezekiel 11 in the EMTV

Ezekiel 11 in the ESV

Ezekiel 11 in the FBV

Ezekiel 11 in the FEB

Ezekiel 11 in the GGMNT

Ezekiel 11 in the GNT

Ezekiel 11 in the HARY

Ezekiel 11 in the HNT

Ezekiel 11 in the IRVA

Ezekiel 11 in the IRVB

Ezekiel 11 in the IRVG

Ezekiel 11 in the IRVH

Ezekiel 11 in the IRVK

Ezekiel 11 in the IRVM2

Ezekiel 11 in the IRVO

Ezekiel 11 in the IRVP

Ezekiel 11 in the IRVT

Ezekiel 11 in the IRVT2

Ezekiel 11 in the IRVU

Ezekiel 11 in the ISVN

Ezekiel 11 in the JSNT

Ezekiel 11 in the KAPI

Ezekiel 11 in the KBT1ETNIK

Ezekiel 11 in the KBV

Ezekiel 11 in the KJV

Ezekiel 11 in the KNFD

Ezekiel 11 in the LBA

Ezekiel 11 in the LBLA

Ezekiel 11 in the LNT

Ezekiel 11 in the LSV

Ezekiel 11 in the MAAL

Ezekiel 11 in the MBV

Ezekiel 11 in the MBV2

Ezekiel 11 in the MHNT

Ezekiel 11 in the MKNFD

Ezekiel 11 in the MNG

Ezekiel 11 in the MNT

Ezekiel 11 in the MNT2

Ezekiel 11 in the MRS1T

Ezekiel 11 in the NAA

Ezekiel 11 in the NASB

Ezekiel 11 in the NBLA

Ezekiel 11 in the NBS

Ezekiel 11 in the NBVTP

Ezekiel 11 in the NET2

Ezekiel 11 in the NIV11

Ezekiel 11 in the NNT

Ezekiel 11 in the NNT2

Ezekiel 11 in the NNT3

Ezekiel 11 in the PDDPT

Ezekiel 11 in the PFNT

Ezekiel 11 in the RMNT

Ezekiel 11 in the SBIAS

Ezekiel 11 in the SBIBS

Ezekiel 11 in the SBIBS2

Ezekiel 11 in the SBICS

Ezekiel 11 in the SBIDS

Ezekiel 11 in the SBIGS

Ezekiel 11 in the SBIHS

Ezekiel 11 in the SBIIS

Ezekiel 11 in the SBIIS2

Ezekiel 11 in the SBIIS3

Ezekiel 11 in the SBIKS

Ezekiel 11 in the SBIKS2

Ezekiel 11 in the SBIMS

Ezekiel 11 in the SBIOS

Ezekiel 11 in the SBIPS

Ezekiel 11 in the SBISS

Ezekiel 11 in the SBITS

Ezekiel 11 in the SBITS2

Ezekiel 11 in the SBITS3

Ezekiel 11 in the SBITS4

Ezekiel 11 in the SBIUS

Ezekiel 11 in the SBIVS

Ezekiel 11 in the SBT

Ezekiel 11 in the SBT1E

Ezekiel 11 in the SCHL

Ezekiel 11 in the SNT

Ezekiel 11 in the SUSU

Ezekiel 11 in the SUSU2

Ezekiel 11 in the SYNO

Ezekiel 11 in the TBIAOTANT

Ezekiel 11 in the TBT1E

Ezekiel 11 in the TBT1E2

Ezekiel 11 in the TFTIP

Ezekiel 11 in the TFTU

Ezekiel 11 in the TGNTATF3T

Ezekiel 11 in the THAI

Ezekiel 11 in the TNFD

Ezekiel 11 in the TNT

Ezekiel 11 in the TNTIK

Ezekiel 11 in the TNTIL

Ezekiel 11 in the TNTIN

Ezekiel 11 in the TNTIP

Ezekiel 11 in the TNTIZ

Ezekiel 11 in the TOMA

Ezekiel 11 in the TTENT

Ezekiel 11 in the UBG

Ezekiel 11 in the UGV

Ezekiel 11 in the UGV2

Ezekiel 11 in the UGV3

Ezekiel 11 in the VBL

Ezekiel 11 in the VDCC

Ezekiel 11 in the YALU

Ezekiel 11 in the YAPE

Ezekiel 11 in the YBVTP

Ezekiel 11 in the ZBP