Ezekiel 34 (IRVM)

1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, 2 “मानवाच्या मुला, इस्राएलाच्या मेंढपाळाविरूद्ध भविष्य सांग! भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर मेंढपाळाविषयी असे म्हणतो, जे इस्राएलाचे मेंढपाळ स्वत:च चरत आहेत त्यास धिक्कार असो! मेंढपाळाने आपल्या कळपाची काळजी घ्यायला नको का? 3 तुम्ही चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता. तुम्ही कळपातील धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण तुम्ही मेंढरांना कधीच चारत नाही. 4 जे कोणी दुर्बळ होते त्यांना तुम्ही सबळ केले नाही किंवा तुम्ही आजाऱ्यांना बरे केले नाही. तुम्ही जे कोणी मोडले त्यांना पट्टी बांधली नाही. आणि जे घालवून दिलेले त्यास परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधत नाही. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व जुलमाने राज्य करता. 5 मग मेंढपाळ नसल्याने त्यांची पांगापांग झाली आणि त्यांची पांगापाग झाल्यानंतर ते रानातील सर्व जिवंत पशूंचे भक्ष्य बनले. 6 माझा कळप सर्व डोंगरांतून व प्रत्येक उंच टेकड्यांवरुन भटकून गेली, पृथ्वीच्या सर्व पाठीवर पांगविली गेली. तरी त्यांना शोधण्यास कोणीही नव्हते. 7 म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 8 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे; माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; कारण तेथे त्यांना मेंढपाळ नव्हता ती वनपशूस भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी कोणीही कळपाला शोधले नाही परंतु मेंढपाळाने स्वतःची काळजी घेतली आणि माझ्या कळपाला चारले नाही. 9 तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 10 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मेंढपाळांच्याविरूद्ध आहे आणि मी माझी मेंढरे त्यांच्या हातातून मागेन. त्यांचे कळप पाळणे मी बंद करीन; मग मेंढपाळ आपणास पुढे पोसणार नाहीत आणि मी आपली मेंढरे त्यांच्यामुखातून सोडवीन, अशासाठी की, माझी मेंढरे त्यांची भक्ष्य अशी होऊ नयेत. 11 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन, 12 जो मेंढपाळ आपल्या पांगलेल्या मेंढ्यांबरोबर राहून त्यास शोधतो, तसाच मी आपली मेंढरे शोधीन आणि आभाळाच्या व अंधकाराच्या दिवशी त्यांची पांगापाग झाली त्या सर्व ठिकाणाहून मी त्यांना सोडवीन. 13 मग मी त्यांना लोकांतून काढून आणीन. देशातून त्यांना एकत्र करीन व त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलाच्या पर्वताच्याबाजूला, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी कुरणात चारीन. 14 मी त्यांना चांगल्या कुरणांत ठेवीन. त्यांचे कुरण इस्राएलाच्या डोंगरावरील उंच ठिकाणी होईल; तेथे ती चांगल्या कुरणात पहुडतील. इस्राएलाच्या डोंगरावर ती उत्तम हिरवळीवर त्या चरतील. 15 मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांना विश्रांती देईन, असे प्रभू परमेश्वर, म्हणतो. 16 हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन व भटकलेल्यांना मी परत आणीन. जे मोडलेले त्यास मी पट्टी बांधीन आणि रोगी मेंढीस बरे करीन. व मी पुष्ट व बलिष्ट यांना नामशेष करीन. त्यास मी यथान्याय चारीन. 17 आणि प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तू माझ्या कळपा, पाहा, मी मेंढरामेंढरामध्ये, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन. 18 तुम्ही चांगले कुरण खाऊन टाकता उरलेले कुरण तुम्ही आपल्या पायांनी तुडवता आणि तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हास वाटते का? 19 पण माझी मेंढरे आता तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत खातात आणि तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात. 20 म्हणून, प्रभू परमेश्वर, त्यांना असे म्हणतो, पाहा! मी स्वत: पुष्ट मेंढी आणि बारीक ह्यांच्यात निवाडा करीन. 21 तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. आणि जी सर्व दुर्बळ झालेली त्यांना तुम्ही देशा बाहेर घालवून लावीपर्यंत त्यांना तुम्ही भोसकता, 22 म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे त्यांची लूट होणार नाही. आणि मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन. 23 मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारील आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांस चारील; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल. 24 कारण मी परमेश्वर त्यांचा देव होईन. व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद त्यामध्ये अधिपती होईल मी परमेश्वर बोललो आहे. 25 मग मी त्यांच्याबरोबर एक शांततेचा करार करीन आणि दुष्ट वन्य पशू देशातून नाहीसे करीन, मग माझ्या मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहतील आणि रानात झोपतील. 26 मग मी त्यास व डोंगराभोवतालच्या स्थानांस आशीर्वाद असे करीन. कारण मी योग्य वेळी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांचे वर्षाव होतील. 27 नंतर शेतातली झाडे त्यांचे फळ उत्पन्न करतील. आणि पृथ्वी आपला उपज देईल. माझी मेंढरे त्यांच्या देशात सुरक्षित राहतील; मी त्यांच्या जोखडाचे बंधने तोडून ज्यांनी त्यांना आपले दास केले त्यांच्या हातातून सोडवले म्हणजे ते जाणतील की मी परमेश्वर आहे. 28 यापुढे ते राष्ट्रांसाठी लूट असे होणार नाहीत आणि पृथ्वीवरील वनपशू त्यांना खाऊन टाकणार नाहीत. कारण ते सुखरुप राहतील. व कोणीही त्यांना भयभीत करणार नाही. 29 कारण मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, मग त्यांची पुन्हा देशात दुष्काळाने उपासमार होणार नाही. यापुढे राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही. 30 मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलाचे घराणे माझे लोक आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 31 कारण तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. आणि माझे लोक! मी तुमचा देव आहे! असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

In Other Versions

Ezekiel 34 in the ANGEFD

Ezekiel 34 in the ANTPNG2D

Ezekiel 34 in the AS21

Ezekiel 34 in the BAGH

Ezekiel 34 in the BBPNG

Ezekiel 34 in the BBT1E

Ezekiel 34 in the BDS

Ezekiel 34 in the BEV

Ezekiel 34 in the BHAD

Ezekiel 34 in the BIB

Ezekiel 34 in the BLPT

Ezekiel 34 in the BNT

Ezekiel 34 in the BNTABOOT

Ezekiel 34 in the BNTLV

Ezekiel 34 in the BOATCB

Ezekiel 34 in the BOATCB2

Ezekiel 34 in the BOBCV

Ezekiel 34 in the BOCNT

Ezekiel 34 in the BOECS

Ezekiel 34 in the BOGWICC

Ezekiel 34 in the BOHCB

Ezekiel 34 in the BOHCV

Ezekiel 34 in the BOHLNT

Ezekiel 34 in the BOHNTLTAL

Ezekiel 34 in the BOICB

Ezekiel 34 in the BOILNTAP

Ezekiel 34 in the BOITCV

Ezekiel 34 in the BOKCV

Ezekiel 34 in the BOKCV2

Ezekiel 34 in the BOKHWOG

Ezekiel 34 in the BOKSSV

Ezekiel 34 in the BOLCB

Ezekiel 34 in the BOLCB2

Ezekiel 34 in the BOMCV

Ezekiel 34 in the BONAV

Ezekiel 34 in the BONCB

Ezekiel 34 in the BONLT

Ezekiel 34 in the BONUT2

Ezekiel 34 in the BOPLNT

Ezekiel 34 in the BOSCB

Ezekiel 34 in the BOSNC

Ezekiel 34 in the BOTLNT

Ezekiel 34 in the BOVCB

Ezekiel 34 in the BOYCB

Ezekiel 34 in the BPBB

Ezekiel 34 in the BPH

Ezekiel 34 in the BSB

Ezekiel 34 in the CCB

Ezekiel 34 in the CUV

Ezekiel 34 in the CUVS

Ezekiel 34 in the DBT

Ezekiel 34 in the DGDNT

Ezekiel 34 in the DHNT

Ezekiel 34 in the DNT

Ezekiel 34 in the ELBE

Ezekiel 34 in the EMTV

Ezekiel 34 in the ESV

Ezekiel 34 in the FBV

Ezekiel 34 in the FEB

Ezekiel 34 in the GGMNT

Ezekiel 34 in the GNT

Ezekiel 34 in the HARY

Ezekiel 34 in the HNT

Ezekiel 34 in the IRVA

Ezekiel 34 in the IRVB

Ezekiel 34 in the IRVG

Ezekiel 34 in the IRVH

Ezekiel 34 in the IRVK

Ezekiel 34 in the IRVM2

Ezekiel 34 in the IRVO

Ezekiel 34 in the IRVP

Ezekiel 34 in the IRVT

Ezekiel 34 in the IRVT2

Ezekiel 34 in the IRVU

Ezekiel 34 in the ISVN

Ezekiel 34 in the JSNT

Ezekiel 34 in the KAPI

Ezekiel 34 in the KBT1ETNIK

Ezekiel 34 in the KBV

Ezekiel 34 in the KJV

Ezekiel 34 in the KNFD

Ezekiel 34 in the LBA

Ezekiel 34 in the LBLA

Ezekiel 34 in the LNT

Ezekiel 34 in the LSV

Ezekiel 34 in the MAAL

Ezekiel 34 in the MBV

Ezekiel 34 in the MBV2

Ezekiel 34 in the MHNT

Ezekiel 34 in the MKNFD

Ezekiel 34 in the MNG

Ezekiel 34 in the MNT

Ezekiel 34 in the MNT2

Ezekiel 34 in the MRS1T

Ezekiel 34 in the NAA

Ezekiel 34 in the NASB

Ezekiel 34 in the NBLA

Ezekiel 34 in the NBS

Ezekiel 34 in the NBVTP

Ezekiel 34 in the NET2

Ezekiel 34 in the NIV11

Ezekiel 34 in the NNT

Ezekiel 34 in the NNT2

Ezekiel 34 in the NNT3

Ezekiel 34 in the PDDPT

Ezekiel 34 in the PFNT

Ezekiel 34 in the RMNT

Ezekiel 34 in the SBIAS

Ezekiel 34 in the SBIBS

Ezekiel 34 in the SBIBS2

Ezekiel 34 in the SBICS

Ezekiel 34 in the SBIDS

Ezekiel 34 in the SBIGS

Ezekiel 34 in the SBIHS

Ezekiel 34 in the SBIIS

Ezekiel 34 in the SBIIS2

Ezekiel 34 in the SBIIS3

Ezekiel 34 in the SBIKS

Ezekiel 34 in the SBIKS2

Ezekiel 34 in the SBIMS

Ezekiel 34 in the SBIOS

Ezekiel 34 in the SBIPS

Ezekiel 34 in the SBISS

Ezekiel 34 in the SBITS

Ezekiel 34 in the SBITS2

Ezekiel 34 in the SBITS3

Ezekiel 34 in the SBITS4

Ezekiel 34 in the SBIUS

Ezekiel 34 in the SBIVS

Ezekiel 34 in the SBT

Ezekiel 34 in the SBT1E

Ezekiel 34 in the SCHL

Ezekiel 34 in the SNT

Ezekiel 34 in the SUSU

Ezekiel 34 in the SUSU2

Ezekiel 34 in the SYNO

Ezekiel 34 in the TBIAOTANT

Ezekiel 34 in the TBT1E

Ezekiel 34 in the TBT1E2

Ezekiel 34 in the TFTIP

Ezekiel 34 in the TFTU

Ezekiel 34 in the TGNTATF3T

Ezekiel 34 in the THAI

Ezekiel 34 in the TNFD

Ezekiel 34 in the TNT

Ezekiel 34 in the TNTIK

Ezekiel 34 in the TNTIL

Ezekiel 34 in the TNTIN

Ezekiel 34 in the TNTIP

Ezekiel 34 in the TNTIZ

Ezekiel 34 in the TOMA

Ezekiel 34 in the TTENT

Ezekiel 34 in the UBG

Ezekiel 34 in the UGV

Ezekiel 34 in the UGV2

Ezekiel 34 in the UGV3

Ezekiel 34 in the VBL

Ezekiel 34 in the VDCC

Ezekiel 34 in the YALU

Ezekiel 34 in the YAPE

Ezekiel 34 in the YBVTP

Ezekiel 34 in the ZBP