Ezekiel 45 (IRVM)

1 जेव्हा तुम्ही वतनासाठी चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वरास अर्पायचा प्रदेश, देशाचा पवित्र विभाग, तुम्ही अर्पण कराल, त्याची लांबी पंचवीस हजार हात व रुंदी वीस हजार हात असावी. त्याच्या सभोवतालचा सर्व प्रदेश पवित्र होईल. 2 यापैकी पांचशे हात लांब व पांचशे हात रुंद एवढी चौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नास हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती चौरस असावी. 3 त्या मोजलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जागा मोजून काढ. 4 जे याजक पवित्रस्थानाचे सेवा करावयास परमेश्वराजवळ येतील त्यांना हा भूमीचा पवित्र प्रदेश होईल. तो त्यांना त्यांच्या घरासाठी जागा आणि पवित्रस्थानासाठी पवित्र जागा होईल. 5 म्हणून ती पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद, एवढी जागा जे कोणी लेवी मंदिरात सेवा करतात त्यांची व्हावी. वस्तीसाठी हे त्यांचे वतन होय. 6 अर्पिलेला पवित्र प्रदेशसुद्धा तुम्ही पाच हजार हात रुंद व पंचवीस हजार हात लांब प्रदेश नगराचा विभाग म्हणून नेमून द्याल; तो इस्राएलाच्या सर्व घराण्याला होईल. 7 “अर्पिलेल्या पवित्र प्रदेशाच्या व नगराच्या विभागाच्या एकाबाजूस व दुसऱ्याबाजूस अर्पिलेल्या पवित्र प्रदेशासमोर आणि नगराच्या विभागासमोर पश्चिम सीमेपासून पश्चिमेकडे, आणि पूर्व सीमेपासून पूर्वेकडे अधिपतीस विभाग होईल. 8 ही जमीन इस्राएलात अधिपतीचे वतन व्हावी म्हणजे यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये; तर त्याऐवजी इस्राएल घराण्याला त्यांच्या त्यांच्या वंशाप्रमाणे जमीन द्यावी. 9 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे होवो. जबरदस्ती आणि जुलूम दूर करा! न्याय व न्यायीपण आचरा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 10 तुम्ही खरी तागडी, खरी एफा, खरी बथ वापरा. 11 एफा व बथ सारख्याच मापाचे असावे. याकरिता बथ होमराचा दहावा भाग; तशीच एफाही होमराचा दहावा भाग; या होमराच्या मापाप्रमाणे असाव्या. 12 शेकेल वीस गेराचा असावा. माने वीस शेकेलाचा, पंचवीस शेकेलाचा किंवा पंधरा शेकेलाचा असावा. 13 तुमची जे अर्पणे अर्पावयाचे ती अशी असावीः तुम्ही होमभर गव्हातून एफाचा सहावा भाग गहू व होमरभर जवातून एफाचा सहावा भाग जव द्यावा. 14 तेलाचा नियम हाच, तुम्ही तेलाच्या बथाचा म्हणजे खोरभर तेलातून बथाचा दहावा भाग अर्पावा; दहा बथांचा खोर म्हणजे एक होमर, कारण दहा बथ एक होमर आहेत; 15 आणि इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणातील दोनशे मेंढरांच्या कळपातून एक कोकरू, अन्नार्पण व होमार्पण व शांत्यर्पणे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 16 देशातील सर्व लोकांनी इस्राएलातल्या अधिपतीस ही अर्पणे दिली पाहिजेत. 17 उत्सव, व चंद्रदर्शने, शब्बाथ आणि इस्राएलाच्या घराण्याचे सर्व सण यामध्ये अन्नार्पण, होमार्पण व पेयार्पण याची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे. इस्राएल घराण्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी त्याने अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावी. 18 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पहिल्या महिन्यात, महिन्याच्या पहिल्या दिवशी, तू निर्दोष तरुण गोऱ्हा घेऊन पवित्रस्थानाची शुद्धी कर. 19 तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला, वेदीच्या बैठकीच्या चाऱ्ही कोपऱ्यांवर व आंतील अंगणाच्या दरवाजाच्या चौकटीला लावावे.” 20 पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, प्रत्येक चुकलेल्या किंवा भोळ्या मनुष्याकरता तू तसेच करशील आणि तुम्ही याप्रकारे मंदिरासाठी प्रायश्चित करावे. 21 पहिल्या महिन्यात, महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्हास सात दिवसाचा वल्हांडण सण होईल, त्यामध्ये बेखमीर भाकर खावी. 22 त्यादिवशी अधिपती आपणासाठी आणि देशातील सर्व लोकांसाठी पापार्पणासाठी एक गोऱ्हा सिद्ध करील. 23 परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोऱ्हे व सात मेंढे सिद्ध करावे आणि पापर्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा. 24 मग अधिपती एका गोऱ्ह्यासाठी एफाभर व एका मेंढ्यासाठी एफाभर अन्नार्पण आणि एफासाठी हीनभर तेल सिद्ध करील, पापार्पण म्हणून बैल देईल. 25 सातव्या महिन्यात, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, सणात, सात दिवसपर्यंत तो पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही याप्रमाणेच सिद्ध करील.

In Other Versions

Ezekiel 45 in the ANGEFD

Ezekiel 45 in the ANTPNG2D

Ezekiel 45 in the AS21

Ezekiel 45 in the BAGH

Ezekiel 45 in the BBPNG

Ezekiel 45 in the BBT1E

Ezekiel 45 in the BDS

Ezekiel 45 in the BEV

Ezekiel 45 in the BHAD

Ezekiel 45 in the BIB

Ezekiel 45 in the BLPT

Ezekiel 45 in the BNT

Ezekiel 45 in the BNTABOOT

Ezekiel 45 in the BNTLV

Ezekiel 45 in the BOATCB

Ezekiel 45 in the BOATCB2

Ezekiel 45 in the BOBCV

Ezekiel 45 in the BOCNT

Ezekiel 45 in the BOECS

Ezekiel 45 in the BOGWICC

Ezekiel 45 in the BOHCB

Ezekiel 45 in the BOHCV

Ezekiel 45 in the BOHLNT

Ezekiel 45 in the BOHNTLTAL

Ezekiel 45 in the BOICB

Ezekiel 45 in the BOILNTAP

Ezekiel 45 in the BOITCV

Ezekiel 45 in the BOKCV

Ezekiel 45 in the BOKCV2

Ezekiel 45 in the BOKHWOG

Ezekiel 45 in the BOKSSV

Ezekiel 45 in the BOLCB

Ezekiel 45 in the BOLCB2

Ezekiel 45 in the BOMCV

Ezekiel 45 in the BONAV

Ezekiel 45 in the BONCB

Ezekiel 45 in the BONLT

Ezekiel 45 in the BONUT2

Ezekiel 45 in the BOPLNT

Ezekiel 45 in the BOSCB

Ezekiel 45 in the BOSNC

Ezekiel 45 in the BOTLNT

Ezekiel 45 in the BOVCB

Ezekiel 45 in the BOYCB

Ezekiel 45 in the BPBB

Ezekiel 45 in the BPH

Ezekiel 45 in the BSB

Ezekiel 45 in the CCB

Ezekiel 45 in the CUV

Ezekiel 45 in the CUVS

Ezekiel 45 in the DBT

Ezekiel 45 in the DGDNT

Ezekiel 45 in the DHNT

Ezekiel 45 in the DNT

Ezekiel 45 in the ELBE

Ezekiel 45 in the EMTV

Ezekiel 45 in the ESV

Ezekiel 45 in the FBV

Ezekiel 45 in the FEB

Ezekiel 45 in the GGMNT

Ezekiel 45 in the GNT

Ezekiel 45 in the HARY

Ezekiel 45 in the HNT

Ezekiel 45 in the IRVA

Ezekiel 45 in the IRVB

Ezekiel 45 in the IRVG

Ezekiel 45 in the IRVH

Ezekiel 45 in the IRVK

Ezekiel 45 in the IRVM2

Ezekiel 45 in the IRVO

Ezekiel 45 in the IRVP

Ezekiel 45 in the IRVT

Ezekiel 45 in the IRVT2

Ezekiel 45 in the IRVU

Ezekiel 45 in the ISVN

Ezekiel 45 in the JSNT

Ezekiel 45 in the KAPI

Ezekiel 45 in the KBT1ETNIK

Ezekiel 45 in the KBV

Ezekiel 45 in the KJV

Ezekiel 45 in the KNFD

Ezekiel 45 in the LBA

Ezekiel 45 in the LBLA

Ezekiel 45 in the LNT

Ezekiel 45 in the LSV

Ezekiel 45 in the MAAL

Ezekiel 45 in the MBV

Ezekiel 45 in the MBV2

Ezekiel 45 in the MHNT

Ezekiel 45 in the MKNFD

Ezekiel 45 in the MNG

Ezekiel 45 in the MNT

Ezekiel 45 in the MNT2

Ezekiel 45 in the MRS1T

Ezekiel 45 in the NAA

Ezekiel 45 in the NASB

Ezekiel 45 in the NBLA

Ezekiel 45 in the NBS

Ezekiel 45 in the NBVTP

Ezekiel 45 in the NET2

Ezekiel 45 in the NIV11

Ezekiel 45 in the NNT

Ezekiel 45 in the NNT2

Ezekiel 45 in the NNT3

Ezekiel 45 in the PDDPT

Ezekiel 45 in the PFNT

Ezekiel 45 in the RMNT

Ezekiel 45 in the SBIAS

Ezekiel 45 in the SBIBS

Ezekiel 45 in the SBIBS2

Ezekiel 45 in the SBICS

Ezekiel 45 in the SBIDS

Ezekiel 45 in the SBIGS

Ezekiel 45 in the SBIHS

Ezekiel 45 in the SBIIS

Ezekiel 45 in the SBIIS2

Ezekiel 45 in the SBIIS3

Ezekiel 45 in the SBIKS

Ezekiel 45 in the SBIKS2

Ezekiel 45 in the SBIMS

Ezekiel 45 in the SBIOS

Ezekiel 45 in the SBIPS

Ezekiel 45 in the SBISS

Ezekiel 45 in the SBITS

Ezekiel 45 in the SBITS2

Ezekiel 45 in the SBITS3

Ezekiel 45 in the SBITS4

Ezekiel 45 in the SBIUS

Ezekiel 45 in the SBIVS

Ezekiel 45 in the SBT

Ezekiel 45 in the SBT1E

Ezekiel 45 in the SCHL

Ezekiel 45 in the SNT

Ezekiel 45 in the SUSU

Ezekiel 45 in the SUSU2

Ezekiel 45 in the SYNO

Ezekiel 45 in the TBIAOTANT

Ezekiel 45 in the TBT1E

Ezekiel 45 in the TBT1E2

Ezekiel 45 in the TFTIP

Ezekiel 45 in the TFTU

Ezekiel 45 in the TGNTATF3T

Ezekiel 45 in the THAI

Ezekiel 45 in the TNFD

Ezekiel 45 in the TNT

Ezekiel 45 in the TNTIK

Ezekiel 45 in the TNTIL

Ezekiel 45 in the TNTIN

Ezekiel 45 in the TNTIP

Ezekiel 45 in the TNTIZ

Ezekiel 45 in the TOMA

Ezekiel 45 in the TTENT

Ezekiel 45 in the UBG

Ezekiel 45 in the UGV

Ezekiel 45 in the UGV2

Ezekiel 45 in the UGV3

Ezekiel 45 in the VBL

Ezekiel 45 in the VDCC

Ezekiel 45 in the YALU

Ezekiel 45 in the YAPE

Ezekiel 45 in the YBVTP

Ezekiel 45 in the ZBP