1 Chronicles 11 (IRVM)
1 मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत. 2 मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.” 3 असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले. 4 दावीद व सर्व इस्राएल लोक यरूशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते. 5 यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे. 6 दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल.” सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्यास सेनापती करण्यात आले. 7 मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले. 8 त्याने त्या नगराला चोहीकडून म्हणजे मिल्लोपासून ते सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला. 9 दावीद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर होता. 10 हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले. 11 दावीदाकडील उत्तम सैनिकांची यादी: याशबाम, हा हखमोनीचा पुत्र, तीस जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने तीनशे मनुष्यांना ठार मारले. 12 त्यानंतर दोदय अहोही याचा पुत्र एलाजार तिघा पराक्रमी वीरांपैकी एक होता. 13 पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यांपुढून सैन्य पळून गेले होते. 14 तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला. 15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले. 16 आणखी एकदा दावीद त्याच्या किल्ल्यांत, गुहेत, असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेममध्ये होते. 17 तेव्हा दावीदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल!” 18 यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिंमतीने वाट काढली, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दावीदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले. 19 तो म्हणाला “हे देवा, असले काम माझ्याकडून न होवो या ज्या मनुष्यांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे.” त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या तीन शूरांनी हे कृत्ये केले. 20 यवाबाचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. या तिघा सैनिकांबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो. 21 या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही. 22 कबसेल येथला एक बलवान मनुष्य होता, त्याचा पुत्र यहोयादा बनाया याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरीएलाच्या दोन पुत्रांना ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला. 23 मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसरी सैनिकाला ठार केले. 24 यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी तीन शूरवीरासारखे नाव मिळवले होते. 25 तीस शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता. पण तो त्या तिघांच्या पदास पोहचला नाही. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. 26 सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान, 27 हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी, 28 तकोइच्या इक्केशचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबीयेजर 29 सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही. 30 महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद, 31 बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, 32 गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी, 33 अजमावेथ बहरुमी, अलीहाबा शालबोनी. 34 हामेश गिजोनी याचे पुत्र, शागे हरारी याचा पुत्र योनाथान, 35 हरारी साखार याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र अलीफल, 36 हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, 37 हेस्री कर्मेली, एजबयचा पुत्र नारय. 38 नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार, 39 सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, 40 ईरा, इथ्री, गारेब, इथ्री, 41 उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद. 42 शीजा रऊबेनी याचा पुत्र अदीना हा रऊबेन्याचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक, 43 माकाचा पुत्र हानान आणि योशाफाट मिथनी, 44 उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व ईयेल. 45 शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा 46 अलीएल महवी व एलानामचे पुत्र यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी, 47 अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.
In Other Versions
1 Chronicles 11 in the ANTPNG2D
1 Chronicles 11 in the BNTABOOT
1 Chronicles 11 in the BOATCB2
1 Chronicles 11 in the BOGWICC
1 Chronicles 11 in the BOHNTLTAL
1 Chronicles 11 in the BOILNTAP
1 Chronicles 11 in the BOKHWOG
1 Chronicles 11 in the KBT1ETNIK
1 Chronicles 11 in the TBIAOTANT