2 Chronicles 12 (IRVM)
1 रहबामाचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले. 2 रहबामाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरूशलेमेवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले. 3 शिशककडे बारा हजार रथ, साठ हजार घोडेस्वार आणि असंख्य पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की, कुशी हे मिसरातून आलेले लोक होते. 4 यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरूशलेमेला आणले. 5 तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि यहूदाच्या वडिलधाऱ्या मंडळीकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीलधारी मंडळी यरूशलेमेला जमली होती. शमाया रहबामाला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हास सोडून शिशकच्या हाती दिले आहे.” 6 तेव्हा इस्राएलाचे सरदार आणि राजे यांनी पश्चाताप करून ते विनम्र झाले. “परमेश्वर न्यायी आहे.” असे त्यांनी उदगार काढले. 7 ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा पुन्हा शमायाला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला, “राजा आणि ही मंडळी माझ्यापुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही. थोड्याफार प्रमाणात मी त्यांना मुक्त करीन. शिशक मार्फत यरूशलेमेला मी माझ्या कोपाचे लक्ष्य करणार नाही. 8 पण यरूशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.” 9 शिशकने यरूशलेमेवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला. शिशक हा मिसरचा राजा होता. राजमहालातील खजिनाही त्याने लुटला. शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या. 10 त्या सोन्याच्या ढालीऐवजी रहबामाने पितळेच्या ढाली केल्या. त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या. 11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत. 12 रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता. 13 रहबामाने यरूशलेमामध्ये आपले सामर्थ्य वाढवले व राज्य केले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सतरा वर्षे राज्य केले, इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरूशलेमची निवड केली होती. आपले नाव रहावे म्हणून त्याने यरूशलेम निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा; नामा अम्मोनीण नगरातली होती. 14 रहबामाने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता. 15 शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामाने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण हकिकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत. 16 रहबामाने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली. दावीद नगरात त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र अबीया राजा झाला.
In Other Versions
2 Chronicles 12 in the ANTPNG2D
2 Chronicles 12 in the BNTABOOT
2 Chronicles 12 in the BOATCB2
2 Chronicles 12 in the BOGWICC
2 Chronicles 12 in the BOHNTLTAL
2 Chronicles 12 in the BOILNTAP
2 Chronicles 12 in the BOKHWOG
2 Chronicles 12 in the KBT1ETNIK
2 Chronicles 12 in the TBIAOTANT