Deuteronomy 15 (IRVM)

1 प्रत्येक सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे. 2 त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्यास परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. 3 परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे. 4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरुन आशीर्वाद देणार आहे 5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा. 6 मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही. 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका. 8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या. 9 कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हास पाप लागेल. 10 तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हास परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल. 11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा. 12 एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा. 13 पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका. 14 तर तुझी गुरे, खळे, द्राक्षकुंड यातून उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास भरभरुन मिळाले आहे, त्या प्रमाणात त्यास दे. 15 आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हास आज ही आज्ञा देत आहे. 16 असे घडेल की, तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासुन दूर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही. 17 तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा. 18 दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हास जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हास द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षात ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल. 19 तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका. 20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा. 21 पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बली देऊ नका. 22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे. 23 फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.

In Other Versions

Deuteronomy 15 in the ANGEFD

Deuteronomy 15 in the ANTPNG2D

Deuteronomy 15 in the AS21

Deuteronomy 15 in the BAGH

Deuteronomy 15 in the BBPNG

Deuteronomy 15 in the BBT1E

Deuteronomy 15 in the BDS

Deuteronomy 15 in the BEV

Deuteronomy 15 in the BHAD

Deuteronomy 15 in the BIB

Deuteronomy 15 in the BLPT

Deuteronomy 15 in the BNT

Deuteronomy 15 in the BNTABOOT

Deuteronomy 15 in the BNTLV

Deuteronomy 15 in the BOATCB

Deuteronomy 15 in the BOATCB2

Deuteronomy 15 in the BOBCV

Deuteronomy 15 in the BOCNT

Deuteronomy 15 in the BOECS

Deuteronomy 15 in the BOGWICC

Deuteronomy 15 in the BOHCB

Deuteronomy 15 in the BOHCV

Deuteronomy 15 in the BOHLNT

Deuteronomy 15 in the BOHNTLTAL

Deuteronomy 15 in the BOICB

Deuteronomy 15 in the BOILNTAP

Deuteronomy 15 in the BOITCV

Deuteronomy 15 in the BOKCV

Deuteronomy 15 in the BOKCV2

Deuteronomy 15 in the BOKHWOG

Deuteronomy 15 in the BOKSSV

Deuteronomy 15 in the BOLCB

Deuteronomy 15 in the BOLCB2

Deuteronomy 15 in the BOMCV

Deuteronomy 15 in the BONAV

Deuteronomy 15 in the BONCB

Deuteronomy 15 in the BONLT

Deuteronomy 15 in the BONUT2

Deuteronomy 15 in the BOPLNT

Deuteronomy 15 in the BOSCB

Deuteronomy 15 in the BOSNC

Deuteronomy 15 in the BOTLNT

Deuteronomy 15 in the BOVCB

Deuteronomy 15 in the BOYCB

Deuteronomy 15 in the BPBB

Deuteronomy 15 in the BPH

Deuteronomy 15 in the BSB

Deuteronomy 15 in the CCB

Deuteronomy 15 in the CUV

Deuteronomy 15 in the CUVS

Deuteronomy 15 in the DBT

Deuteronomy 15 in the DGDNT

Deuteronomy 15 in the DHNT

Deuteronomy 15 in the DNT

Deuteronomy 15 in the ELBE

Deuteronomy 15 in the EMTV

Deuteronomy 15 in the ESV

Deuteronomy 15 in the FBV

Deuteronomy 15 in the FEB

Deuteronomy 15 in the GGMNT

Deuteronomy 15 in the GNT

Deuteronomy 15 in the HARY

Deuteronomy 15 in the HNT

Deuteronomy 15 in the IRVA

Deuteronomy 15 in the IRVB

Deuteronomy 15 in the IRVG

Deuteronomy 15 in the IRVH

Deuteronomy 15 in the IRVK

Deuteronomy 15 in the IRVM2

Deuteronomy 15 in the IRVO

Deuteronomy 15 in the IRVP

Deuteronomy 15 in the IRVT

Deuteronomy 15 in the IRVT2

Deuteronomy 15 in the IRVU

Deuteronomy 15 in the ISVN

Deuteronomy 15 in the JSNT

Deuteronomy 15 in the KAPI

Deuteronomy 15 in the KBT1ETNIK

Deuteronomy 15 in the KBV

Deuteronomy 15 in the KJV

Deuteronomy 15 in the KNFD

Deuteronomy 15 in the LBA

Deuteronomy 15 in the LBLA

Deuteronomy 15 in the LNT

Deuteronomy 15 in the LSV

Deuteronomy 15 in the MAAL

Deuteronomy 15 in the MBV

Deuteronomy 15 in the MBV2

Deuteronomy 15 in the MHNT

Deuteronomy 15 in the MKNFD

Deuteronomy 15 in the MNG

Deuteronomy 15 in the MNT

Deuteronomy 15 in the MNT2

Deuteronomy 15 in the MRS1T

Deuteronomy 15 in the NAA

Deuteronomy 15 in the NASB

Deuteronomy 15 in the NBLA

Deuteronomy 15 in the NBS

Deuteronomy 15 in the NBVTP

Deuteronomy 15 in the NET2

Deuteronomy 15 in the NIV11

Deuteronomy 15 in the NNT

Deuteronomy 15 in the NNT2

Deuteronomy 15 in the NNT3

Deuteronomy 15 in the PDDPT

Deuteronomy 15 in the PFNT

Deuteronomy 15 in the RMNT

Deuteronomy 15 in the SBIAS

Deuteronomy 15 in the SBIBS

Deuteronomy 15 in the SBIBS2

Deuteronomy 15 in the SBICS

Deuteronomy 15 in the SBIDS

Deuteronomy 15 in the SBIGS

Deuteronomy 15 in the SBIHS

Deuteronomy 15 in the SBIIS

Deuteronomy 15 in the SBIIS2

Deuteronomy 15 in the SBIIS3

Deuteronomy 15 in the SBIKS

Deuteronomy 15 in the SBIKS2

Deuteronomy 15 in the SBIMS

Deuteronomy 15 in the SBIOS

Deuteronomy 15 in the SBIPS

Deuteronomy 15 in the SBISS

Deuteronomy 15 in the SBITS

Deuteronomy 15 in the SBITS2

Deuteronomy 15 in the SBITS3

Deuteronomy 15 in the SBITS4

Deuteronomy 15 in the SBIUS

Deuteronomy 15 in the SBIVS

Deuteronomy 15 in the SBT

Deuteronomy 15 in the SBT1E

Deuteronomy 15 in the SCHL

Deuteronomy 15 in the SNT

Deuteronomy 15 in the SUSU

Deuteronomy 15 in the SUSU2

Deuteronomy 15 in the SYNO

Deuteronomy 15 in the TBIAOTANT

Deuteronomy 15 in the TBT1E

Deuteronomy 15 in the TBT1E2

Deuteronomy 15 in the TFTIP

Deuteronomy 15 in the TFTU

Deuteronomy 15 in the TGNTATF3T

Deuteronomy 15 in the THAI

Deuteronomy 15 in the TNFD

Deuteronomy 15 in the TNT

Deuteronomy 15 in the TNTIK

Deuteronomy 15 in the TNTIL

Deuteronomy 15 in the TNTIN

Deuteronomy 15 in the TNTIP

Deuteronomy 15 in the TNTIZ

Deuteronomy 15 in the TOMA

Deuteronomy 15 in the TTENT

Deuteronomy 15 in the UBG

Deuteronomy 15 in the UGV

Deuteronomy 15 in the UGV2

Deuteronomy 15 in the UGV3

Deuteronomy 15 in the VBL

Deuteronomy 15 in the VDCC

Deuteronomy 15 in the YALU

Deuteronomy 15 in the YAPE

Deuteronomy 15 in the YBVTP

Deuteronomy 15 in the ZBP