Ezekiel 33 (IRVM)

1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, 2 “मानवाच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल त्यांना सांग की, जेव्हा मी कोणत्याही देशाविरूद्ध तलवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका मनुष्यास घेतात आणि त्यास आपल्यासाठी पहारेकरी करतात. 3 तो देशावर तलवार येत आहे असे पाहून आणि तो त्याचे शिंग फुंकून लोकांस सावध करतो. 4 जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही, आणि जर त्यांच्यावर तलवार आली व त्यांना मारले, तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर राहिल. 5 जर कोणी एखाद्याने शिंगाचा आवाज ऐकला आणि लक्ष दिले नाही, त्याचे रक्त त्यावर राहिल. पण जर त्याने लक्ष दिले, तो आपला स्वतःचा जीव वाचवील. 6 पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांस सावध केले नाही, आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन. 7 आता, मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. 8 जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन. 9 पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो मनुष्य त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील. 10 म्हणून हे मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला सांग, तुम्ही म्हणता, की, आमचे अपराध व आमची पापे यांचा बोजा आम्हावर आहे व त्यामुळे त्यामध्ये आम्ही कुजत आहोत. आम्ही कसे जगावे? 11 त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, मला ‘दुष्टांच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला, तर मग तो जिवंत राहील! पश्चाताप करा! तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा! कारण इस्राएल घराण्यांनो, तुम्ही का मरावे?’ 12 आणि मानवाच्या मुला, तू तुझ्या लोकांस सांग, धार्मिक पाप करील तर त्याची धार्मिकता त्यास वाचविणार नाही. आणि दुष्टाने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर दुष्टतेमुळे त्याचा नाश होणार नाही. कारण धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचू शकणार नाही. 13 जर मी धार्मिकाला म्हणालो, तो खचित जिवंत राहिल! आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील, तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्ये मी आठवणार नाही. त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे तो मरेल. 14 आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील! पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय्य आहे ते केले, 15 जर दुष्ट गहाण परत देईल, व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमांमध्ये वागेल तर तो वाचेलच, तो मरणार नाही. 16 त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे, तो खचित जगेल. 17 पण तुझे लोक म्हणतात, प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, परंतु तुझे मार्ग योग्य नाहीत! 18 जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला, तर तो त्यामध्ये मरेल. 19 आणि जेव्हा दुष्ट आपल्या दुष्टतेपासून फिरून जे योग्य व न्याय्य आहे ते करतो तर तो त्या गोष्टीमुळे जगेल. 20 पण तुम्ही लोक म्हणता, प्रभूचा मार्ग बरोबर नाही! इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुमच्या प्रत्येकाचा न्याय त्याच्या मार्गाप्रमाणे करीन.” 21 आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी असे झाले की, यरूशलेमेमधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, “नगर काबीज झाले आहे.” 22 तो फरारी संध्याकाळी येण्यापूर्वी परमेश्वराचा हात माझ्यावर होता, आणि तो सकाळी माझ्याकडे येण्याच्या वेळी परमेश्वराने त्याने माझे मुख उघडले होते. म्हणून माझे मुख उघडे होते; मी मुका राहिलो नाही. 23 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, 24 “मानवाच्या मुला, जे इस्राएल देशाच्या विध्वंस झालेल्या नगरातून राहत आहेत ते बोलतात व म्हणतात, अब्राहाम फक्त एकच पुरुष होता आणि त्यास या देशाचे वतन मिळाले परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत! देश आम्हास वतनासाठी दिला आहे. 25 म्हणून तू त्यांना सांग की प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही आपल्या मूर्तीकडे डोळे लावता, तुम्ही लोकांचे रक्त पाडता. तर मग तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का? 26 तुम्ही तुमच्या स्वत:च्या तलवारीवर अवलंबून राहता आणि तुम्ही अमंगळ गोष्टी करता. प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला अशुद्ध करतो, तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का? 27 तू त्यांना हे सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी जिवंत आहे; त्या नाश झालेल्या नगरात राहणारे लोक तलवारीने खचित मारले जातील. जर एखादा शेतांत असेल, तर त्यास मी पशूचे भक्ष्य म्हणून देईन आणि जे कोणी किल्ल्यात व गुहेत आहेत ते मरीने मरतील. 28 मग मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन आणि त्याच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही. 29 म्हणून त्यांनी ज्या अमंगळ गोष्टी केल्या त्यामुळे जेव्हा मी तो देश ओसाड आणि दहशत असा करीन. तेव्हा त्यांना समजेल की, मीच परमेश्वर आहे. 30 आणि, मानवाच्या मुला, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या घराच्या दारांत उभे राहून, व एक दुसऱ्याशी व प्रत्येक आपल्या भावाशी बोलतो, ते म्हणतात चला, व परमेश्वराकडून संदेष्ट्याकडे आलेले वचन जाऊन ऐकू या. 31 म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्यापुढे बसतात तुझी वचने ऐकतात, परंतु ते ती आचरीत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते. 32 कारण पाहा, ज्याचा स्वर गोड व तू त्यांना मनोहर गीतासारखा, तंतुवाद्यांवर मधुर आवाजात वाजवणारा, असा तू त्यांना आहे. म्हणून ते तुझे वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे ते चालत नाहीत. 33 म्हणून जेव्हा हे सर्व होईल, पाहा! हे होईल! मग त्यांना समजेल की आपल्यामध्ये एक संदेष्टा होता.”

In Other Versions

Ezekiel 33 in the ANGEFD

Ezekiel 33 in the ANTPNG2D

Ezekiel 33 in the AS21

Ezekiel 33 in the BAGH

Ezekiel 33 in the BBPNG

Ezekiel 33 in the BBT1E

Ezekiel 33 in the BDS

Ezekiel 33 in the BEV

Ezekiel 33 in the BHAD

Ezekiel 33 in the BIB

Ezekiel 33 in the BLPT

Ezekiel 33 in the BNT

Ezekiel 33 in the BNTABOOT

Ezekiel 33 in the BNTLV

Ezekiel 33 in the BOATCB

Ezekiel 33 in the BOATCB2

Ezekiel 33 in the BOBCV

Ezekiel 33 in the BOCNT

Ezekiel 33 in the BOECS

Ezekiel 33 in the BOGWICC

Ezekiel 33 in the BOHCB

Ezekiel 33 in the BOHCV

Ezekiel 33 in the BOHLNT

Ezekiel 33 in the BOHNTLTAL

Ezekiel 33 in the BOICB

Ezekiel 33 in the BOILNTAP

Ezekiel 33 in the BOITCV

Ezekiel 33 in the BOKCV

Ezekiel 33 in the BOKCV2

Ezekiel 33 in the BOKHWOG

Ezekiel 33 in the BOKSSV

Ezekiel 33 in the BOLCB

Ezekiel 33 in the BOLCB2

Ezekiel 33 in the BOMCV

Ezekiel 33 in the BONAV

Ezekiel 33 in the BONCB

Ezekiel 33 in the BONLT

Ezekiel 33 in the BONUT2

Ezekiel 33 in the BOPLNT

Ezekiel 33 in the BOSCB

Ezekiel 33 in the BOSNC

Ezekiel 33 in the BOTLNT

Ezekiel 33 in the BOVCB

Ezekiel 33 in the BOYCB

Ezekiel 33 in the BPBB

Ezekiel 33 in the BPH

Ezekiel 33 in the BSB

Ezekiel 33 in the CCB

Ezekiel 33 in the CUV

Ezekiel 33 in the CUVS

Ezekiel 33 in the DBT

Ezekiel 33 in the DGDNT

Ezekiel 33 in the DHNT

Ezekiel 33 in the DNT

Ezekiel 33 in the ELBE

Ezekiel 33 in the EMTV

Ezekiel 33 in the ESV

Ezekiel 33 in the FBV

Ezekiel 33 in the FEB

Ezekiel 33 in the GGMNT

Ezekiel 33 in the GNT

Ezekiel 33 in the HARY

Ezekiel 33 in the HNT

Ezekiel 33 in the IRVA

Ezekiel 33 in the IRVB

Ezekiel 33 in the IRVG

Ezekiel 33 in the IRVH

Ezekiel 33 in the IRVK

Ezekiel 33 in the IRVM2

Ezekiel 33 in the IRVO

Ezekiel 33 in the IRVP

Ezekiel 33 in the IRVT

Ezekiel 33 in the IRVT2

Ezekiel 33 in the IRVU

Ezekiel 33 in the ISVN

Ezekiel 33 in the JSNT

Ezekiel 33 in the KAPI

Ezekiel 33 in the KBT1ETNIK

Ezekiel 33 in the KBV

Ezekiel 33 in the KJV

Ezekiel 33 in the KNFD

Ezekiel 33 in the LBA

Ezekiel 33 in the LBLA

Ezekiel 33 in the LNT

Ezekiel 33 in the LSV

Ezekiel 33 in the MAAL

Ezekiel 33 in the MBV

Ezekiel 33 in the MBV2

Ezekiel 33 in the MHNT

Ezekiel 33 in the MKNFD

Ezekiel 33 in the MNG

Ezekiel 33 in the MNT

Ezekiel 33 in the MNT2

Ezekiel 33 in the MRS1T

Ezekiel 33 in the NAA

Ezekiel 33 in the NASB

Ezekiel 33 in the NBLA

Ezekiel 33 in the NBS

Ezekiel 33 in the NBVTP

Ezekiel 33 in the NET2

Ezekiel 33 in the NIV11

Ezekiel 33 in the NNT

Ezekiel 33 in the NNT2

Ezekiel 33 in the NNT3

Ezekiel 33 in the PDDPT

Ezekiel 33 in the PFNT

Ezekiel 33 in the RMNT

Ezekiel 33 in the SBIAS

Ezekiel 33 in the SBIBS

Ezekiel 33 in the SBIBS2

Ezekiel 33 in the SBICS

Ezekiel 33 in the SBIDS

Ezekiel 33 in the SBIGS

Ezekiel 33 in the SBIHS

Ezekiel 33 in the SBIIS

Ezekiel 33 in the SBIIS2

Ezekiel 33 in the SBIIS3

Ezekiel 33 in the SBIKS

Ezekiel 33 in the SBIKS2

Ezekiel 33 in the SBIMS

Ezekiel 33 in the SBIOS

Ezekiel 33 in the SBIPS

Ezekiel 33 in the SBISS

Ezekiel 33 in the SBITS

Ezekiel 33 in the SBITS2

Ezekiel 33 in the SBITS3

Ezekiel 33 in the SBITS4

Ezekiel 33 in the SBIUS

Ezekiel 33 in the SBIVS

Ezekiel 33 in the SBT

Ezekiel 33 in the SBT1E

Ezekiel 33 in the SCHL

Ezekiel 33 in the SNT

Ezekiel 33 in the SUSU

Ezekiel 33 in the SUSU2

Ezekiel 33 in the SYNO

Ezekiel 33 in the TBIAOTANT

Ezekiel 33 in the TBT1E

Ezekiel 33 in the TBT1E2

Ezekiel 33 in the TFTIP

Ezekiel 33 in the TFTU

Ezekiel 33 in the TGNTATF3T

Ezekiel 33 in the THAI

Ezekiel 33 in the TNFD

Ezekiel 33 in the TNT

Ezekiel 33 in the TNTIK

Ezekiel 33 in the TNTIL

Ezekiel 33 in the TNTIN

Ezekiel 33 in the TNTIP

Ezekiel 33 in the TNTIZ

Ezekiel 33 in the TOMA

Ezekiel 33 in the TTENT

Ezekiel 33 in the UBG

Ezekiel 33 in the UGV

Ezekiel 33 in the UGV2

Ezekiel 33 in the UGV3

Ezekiel 33 in the VBL

Ezekiel 33 in the VDCC

Ezekiel 33 in the YALU

Ezekiel 33 in the YAPE

Ezekiel 33 in the YBVTP

Ezekiel 33 in the ZBP