Jonah 1 (IRVM)

1 अमित्तयाचा पुत्र योना याच्याकडे परमेश्वराचे वचन आले की, 2 “ऊठ, व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्याच्याविरुध्द आरोळी कर; कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे.” 3 परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शीश शहरास दूर पळून जायला निघाला, आणि याफो येथे गेला, तेव्हा तार्शीसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिशास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला. 4 परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले. 5 तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता. 6 मग जहाजाचा मुख्यनायक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ आपल्या ईश्वराला हाक मार, कदाचित तुझा ईश्वर आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” 7 ते सर्व एकमेकाला म्हणाले, “चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे; हे आपणास कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. 8 तेव्हा त्यांनी योनाला म्हटले, “आम्ही तुला विनंती करतो, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे, हे तू आम्हास सांग; तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोणत्या लोकांपैकी आहेस?” 9 योनाने त्यांना म्हटले; “मी इब्री आहे; ज्या स्वर्गातल्या देवाने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली त्या परमेश्वराचे मी भय धरतो.” 10 मग त्या लोकांस अत्यंत भीती वाटली; आणि ते योनाला म्हणाले, “तू हे काय केले?” कारण त्या लोकांनी जाणले की तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. 11 मग ते योनाला म्हणाले, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे?” कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. 12 तो त्यास म्हणाला, “तुम्ही मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे समुद्र तुमच्यासाठी शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला माहीत आहे.” 13 तरीसुध्दा त्या मनुष्यांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता. 14 तेव्हा ते परमेश्वराचा धावा करत म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो या मनुष्याच्या जिवामुळे आमचा नाश होऊ नये, आणि त्याच्या मृत्यूचा दोष आम्हावर येऊ नये; कारण हे परमेश्वरा, जसे तुला योग्य वाटेल तसे तू केले आहेस.” 15 नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला. 16 मग त्या मनुष्यांस परमेश्वराची खूप भीती वाटली, आणि त्यांनी परमेश्वरास यज्ञ केला आणि नवसही केले. 17 मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.

In Other Versions

Jonah 1 in the ANGEFD

Jonah 1 in the ANTPNG2D

Jonah 1 in the AS21

Jonah 1 in the BAGH

Jonah 1 in the BBPNG

Jonah 1 in the BBT1E

Jonah 1 in the BDS

Jonah 1 in the BEV

Jonah 1 in the BHAD

Jonah 1 in the BIB

Jonah 1 in the BLPT

Jonah 1 in the BNT

Jonah 1 in the BNTABOOT

Jonah 1 in the BNTLV

Jonah 1 in the BOATCB

Jonah 1 in the BOATCB2

Jonah 1 in the BOBCV

Jonah 1 in the BOCNT

Jonah 1 in the BOECS

Jonah 1 in the BOGWICC

Jonah 1 in the BOHCB

Jonah 1 in the BOHCV

Jonah 1 in the BOHLNT

Jonah 1 in the BOHNTLTAL

Jonah 1 in the BOICB

Jonah 1 in the BOILNTAP

Jonah 1 in the BOITCV

Jonah 1 in the BOKCV

Jonah 1 in the BOKCV2

Jonah 1 in the BOKHWOG

Jonah 1 in the BOKSSV

Jonah 1 in the BOLCB

Jonah 1 in the BOLCB2

Jonah 1 in the BOMCV

Jonah 1 in the BONAV

Jonah 1 in the BONCB

Jonah 1 in the BONLT

Jonah 1 in the BONUT2

Jonah 1 in the BOPLNT

Jonah 1 in the BOSCB

Jonah 1 in the BOSNC

Jonah 1 in the BOTLNT

Jonah 1 in the BOVCB

Jonah 1 in the BOYCB

Jonah 1 in the BPBB

Jonah 1 in the BPH

Jonah 1 in the BSB

Jonah 1 in the CCB

Jonah 1 in the CUV

Jonah 1 in the CUVS

Jonah 1 in the DBT

Jonah 1 in the DGDNT

Jonah 1 in the DHNT

Jonah 1 in the DNT

Jonah 1 in the ELBE

Jonah 1 in the EMTV

Jonah 1 in the ESV

Jonah 1 in the FBV

Jonah 1 in the FEB

Jonah 1 in the GGMNT

Jonah 1 in the GNT

Jonah 1 in the HARY

Jonah 1 in the HNT

Jonah 1 in the IRVA

Jonah 1 in the IRVB

Jonah 1 in the IRVG

Jonah 1 in the IRVH

Jonah 1 in the IRVK

Jonah 1 in the IRVM2

Jonah 1 in the IRVO

Jonah 1 in the IRVP

Jonah 1 in the IRVT

Jonah 1 in the IRVT2

Jonah 1 in the IRVU

Jonah 1 in the ISVN

Jonah 1 in the JSNT

Jonah 1 in the KAPI

Jonah 1 in the KBT1ETNIK

Jonah 1 in the KBV

Jonah 1 in the KJV

Jonah 1 in the KNFD

Jonah 1 in the LBA

Jonah 1 in the LBLA

Jonah 1 in the LNT

Jonah 1 in the LSV

Jonah 1 in the MAAL

Jonah 1 in the MBV

Jonah 1 in the MBV2

Jonah 1 in the MHNT

Jonah 1 in the MKNFD

Jonah 1 in the MNG

Jonah 1 in the MNT

Jonah 1 in the MNT2

Jonah 1 in the MRS1T

Jonah 1 in the NAA

Jonah 1 in the NASB

Jonah 1 in the NBLA

Jonah 1 in the NBS

Jonah 1 in the NBVTP

Jonah 1 in the NET2

Jonah 1 in the NIV11

Jonah 1 in the NNT

Jonah 1 in the NNT2

Jonah 1 in the NNT3

Jonah 1 in the PDDPT

Jonah 1 in the PFNT

Jonah 1 in the RMNT

Jonah 1 in the SBIAS

Jonah 1 in the SBIBS

Jonah 1 in the SBIBS2

Jonah 1 in the SBICS

Jonah 1 in the SBIDS

Jonah 1 in the SBIGS

Jonah 1 in the SBIHS

Jonah 1 in the SBIIS

Jonah 1 in the SBIIS2

Jonah 1 in the SBIIS3

Jonah 1 in the SBIKS

Jonah 1 in the SBIKS2

Jonah 1 in the SBIMS

Jonah 1 in the SBIOS

Jonah 1 in the SBIPS

Jonah 1 in the SBISS

Jonah 1 in the SBITS

Jonah 1 in the SBITS2

Jonah 1 in the SBITS3

Jonah 1 in the SBITS4

Jonah 1 in the SBIUS

Jonah 1 in the SBIVS

Jonah 1 in the SBT

Jonah 1 in the SBT1E

Jonah 1 in the SCHL

Jonah 1 in the SNT

Jonah 1 in the SUSU

Jonah 1 in the SUSU2

Jonah 1 in the SYNO

Jonah 1 in the TBIAOTANT

Jonah 1 in the TBT1E

Jonah 1 in the TBT1E2

Jonah 1 in the TFTIP

Jonah 1 in the TFTU

Jonah 1 in the TGNTATF3T

Jonah 1 in the THAI

Jonah 1 in the TNFD

Jonah 1 in the TNT

Jonah 1 in the TNTIK

Jonah 1 in the TNTIL

Jonah 1 in the TNTIN

Jonah 1 in the TNTIP

Jonah 1 in the TNTIZ

Jonah 1 in the TOMA

Jonah 1 in the TTENT

Jonah 1 in the UBG

Jonah 1 in the UGV

Jonah 1 in the UGV2

Jonah 1 in the UGV3

Jonah 1 in the VBL

Jonah 1 in the VDCC

Jonah 1 in the YALU

Jonah 1 in the YAPE

Jonah 1 in the YBVTP

Jonah 1 in the ZBP