Leviticus 9 (IRVM)
1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले. 2 तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर. 3 आणि इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत; 4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.” 5 मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले. 6 तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल.” 7 मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.” 8 तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला. 9 मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. 10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला. 11 मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले. 12 नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले. 13 नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला. 14 त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला. 15 मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला. 16 त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला. 17 मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले. 18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले. 19 अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली. 20 त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला. 21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली. 22 मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला. 23 मोशे व अहरोन दर्शनमंडपामध्ये गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांस आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांस दिसले; 24 तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
In Other Versions
Leviticus 9 in the ANGEFD
Leviticus 9 in the ANTPNG2D
Leviticus 9 in the AS21
Leviticus 9 in the BAGH
Leviticus 9 in the BBPNG
Leviticus 9 in the BBT1E
Leviticus 9 in the BDS
Leviticus 9 in the BEV
Leviticus 9 in the BHAD
Leviticus 9 in the BIB
Leviticus 9 in the BLPT
Leviticus 9 in the BNT
Leviticus 9 in the BNTABOOT
Leviticus 9 in the BNTLV
Leviticus 9 in the BOATCB
Leviticus 9 in the BOATCB2
Leviticus 9 in the BOBCV
Leviticus 9 in the BOCNT
Leviticus 9 in the BOECS
Leviticus 9 in the BOGWICC
Leviticus 9 in the BOHCB
Leviticus 9 in the BOHCV
Leviticus 9 in the BOHLNT
Leviticus 9 in the BOHNTLTAL
Leviticus 9 in the BOICB
Leviticus 9 in the BOILNTAP
Leviticus 9 in the BOITCV
Leviticus 9 in the BOKCV
Leviticus 9 in the BOKCV2
Leviticus 9 in the BOKHWOG
Leviticus 9 in the BOKSSV
Leviticus 9 in the BOLCB
Leviticus 9 in the BOLCB2
Leviticus 9 in the BOMCV
Leviticus 9 in the BONAV
Leviticus 9 in the BONCB
Leviticus 9 in the BONLT
Leviticus 9 in the BONUT2
Leviticus 9 in the BOPLNT
Leviticus 9 in the BOSCB
Leviticus 9 in the BOSNC
Leviticus 9 in the BOTLNT
Leviticus 9 in the BOVCB
Leviticus 9 in the BOYCB
Leviticus 9 in the BPBB
Leviticus 9 in the BPH
Leviticus 9 in the BSB
Leviticus 9 in the CCB
Leviticus 9 in the CUV
Leviticus 9 in the CUVS
Leviticus 9 in the DBT
Leviticus 9 in the DGDNT
Leviticus 9 in the DHNT
Leviticus 9 in the DNT
Leviticus 9 in the ELBE
Leviticus 9 in the EMTV
Leviticus 9 in the ESV
Leviticus 9 in the FBV
Leviticus 9 in the FEB
Leviticus 9 in the GGMNT
Leviticus 9 in the GNT
Leviticus 9 in the HARY
Leviticus 9 in the HNT
Leviticus 9 in the IRVA
Leviticus 9 in the IRVB
Leviticus 9 in the IRVG
Leviticus 9 in the IRVH
Leviticus 9 in the IRVK
Leviticus 9 in the IRVM2
Leviticus 9 in the IRVO
Leviticus 9 in the IRVP
Leviticus 9 in the IRVT
Leviticus 9 in the IRVT2
Leviticus 9 in the IRVU
Leviticus 9 in the ISVN
Leviticus 9 in the JSNT
Leviticus 9 in the KAPI
Leviticus 9 in the KBT1ETNIK
Leviticus 9 in the KBV
Leviticus 9 in the KJV
Leviticus 9 in the KNFD
Leviticus 9 in the LBA
Leviticus 9 in the LBLA
Leviticus 9 in the LNT
Leviticus 9 in the LSV
Leviticus 9 in the MAAL
Leviticus 9 in the MBV
Leviticus 9 in the MBV2
Leviticus 9 in the MHNT
Leviticus 9 in the MKNFD
Leviticus 9 in the MNG
Leviticus 9 in the MNT
Leviticus 9 in the MNT2
Leviticus 9 in the MRS1T
Leviticus 9 in the NAA
Leviticus 9 in the NASB
Leviticus 9 in the NBLA
Leviticus 9 in the NBS
Leviticus 9 in the NBVTP
Leviticus 9 in the NET2
Leviticus 9 in the NIV11
Leviticus 9 in the NNT
Leviticus 9 in the NNT2
Leviticus 9 in the NNT3
Leviticus 9 in the PDDPT
Leviticus 9 in the PFNT
Leviticus 9 in the RMNT
Leviticus 9 in the SBIAS
Leviticus 9 in the SBIBS
Leviticus 9 in the SBIBS2
Leviticus 9 in the SBICS
Leviticus 9 in the SBIDS
Leviticus 9 in the SBIGS
Leviticus 9 in the SBIHS
Leviticus 9 in the SBIIS
Leviticus 9 in the SBIIS2
Leviticus 9 in the SBIIS3
Leviticus 9 in the SBIKS
Leviticus 9 in the SBIKS2
Leviticus 9 in the SBIMS
Leviticus 9 in the SBIOS
Leviticus 9 in the SBIPS
Leviticus 9 in the SBISS
Leviticus 9 in the SBITS
Leviticus 9 in the SBITS2
Leviticus 9 in the SBITS3
Leviticus 9 in the SBITS4
Leviticus 9 in the SBIUS
Leviticus 9 in the SBIVS
Leviticus 9 in the SBT
Leviticus 9 in the SBT1E
Leviticus 9 in the SCHL
Leviticus 9 in the SNT
Leviticus 9 in the SUSU
Leviticus 9 in the SUSU2
Leviticus 9 in the SYNO
Leviticus 9 in the TBIAOTANT
Leviticus 9 in the TBT1E
Leviticus 9 in the TBT1E2
Leviticus 9 in the TFTIP
Leviticus 9 in the TFTU
Leviticus 9 in the TGNTATF3T
Leviticus 9 in the THAI
Leviticus 9 in the TNFD
Leviticus 9 in the TNT
Leviticus 9 in the TNTIK
Leviticus 9 in the TNTIL
Leviticus 9 in the TNTIN
Leviticus 9 in the TNTIP
Leviticus 9 in the TNTIZ
Leviticus 9 in the TOMA
Leviticus 9 in the TTENT
Leviticus 9 in the UBG
Leviticus 9 in the UGV
Leviticus 9 in the UGV2
Leviticus 9 in the UGV3
Leviticus 9 in the VBL
Leviticus 9 in the VDCC
Leviticus 9 in the YALU
Leviticus 9 in the YAPE
Leviticus 9 in the YBVTP
Leviticus 9 in the ZBP