Psalms 111 (IRVM)
1 परमेश्वराची स्तुती करा.सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल. 2 परमेश्वराचे कार्य महान आहेत,जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात. 3 त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे,आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. 4 त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले;परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. 5 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो.तो आपला करार नेहमी आठवतो. 6 त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन,आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत. 7 त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे;त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. 8 ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत,ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. 9 त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे;त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे,देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे. 10 परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे;जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते.त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.