2 Kings 1 (IRVM)

1 अहाब राजाच्या मृत्यूनंतर मवाबाने इस्राएलाविरूद्ध बंड केले. 2 नंतर अहज्या आपल्या शोमरोनमधल्या त्याच्या माडीवरच्या खिडकीच्या जाळीतून खाली पडला व जखमी झाला. तेव्हा अहज्याने आपल्या सेवकांना बोलावले आणि त्यांना सांगितले. “जा, आणि एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारून या, मी या दुखण्यातून बरा होईन का.” 3 पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “ऊठ, राजा अहज्याने शोमरोनाहून आपले काही दूत रवाना केले आहेत, त्यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग, ‘इस्राएलात देव नाही काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारायला जात आहा? 4 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “ज्या पलंगावर तू आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.” मग एलीया निघून गेला. 5 जेव्हा दूत परत अहज्या राजाकडे आले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही परत का आलात?” 6 ते त्यास म्हणाले, “एक मनुष्य आम्हास भेटला व तो असे बोलला की, ‘तुम्हास ज्या राजाने पाठवले आहे त्याच्याकडे परत जाऊन त्यास सांगा, परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलात परमेश्वर नाही काय? जो तू एक्रोनचे दैवत बआल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना विचारायला पाठवलेस? ह्यास्तव ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाहीस. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.” 7 अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हास भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?” 8 त्यांनी त्यास उत्तर दिले, “त्याने केसांचा बनवलेला अंगरखा घातला होता आणि कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.” तेव्हा अहज्या म्हणाला, “तो एलीया तिश्बीच आहे.” 9 नंतर अहज्याने आपला एक सरदार पन्नास मनुष्यांसह एलीयाकडे पाठवला. सरदार एलीयाकडे वर गेला, जिथे एलीया एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या (संदेष्ट्या) राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.” 10 एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “जर मी देवाचा मनुष्य (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करून टाको.” तेव्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्याच्या पन्नास जणांना भस्म केले. 11 अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार देखील एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या, राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.” 12 एलीयाने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “जर मी देवाचा मनुष्य (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करो.” पुन्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्या पन्नास मनुष्यांना भस्म केले. 13 अहज्याने आणखी तिसऱ्या सरदारला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाकडे वर आला, व गुडघे टेकून एलीयाला विनवणी करून म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या, माझा आणि माझ्याबरोबरचे हे तुझे पन्नासदास, ह्यांचा जीव तुझ्या दृष्टीने मोलवान असो. 14 खरोखरच, आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली, पण आता माझा जीव तुझ्या दृष्टीने मोलवान असो.” 15 तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, तर त्याच्याबरोबर खाली जा.” तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला खाली गेला. 16 एलीया अहज्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलात विचारायला परमेश्वर नाही काय? म्हणून तू ‘एक्रोनचा देव बआल-जबूबकडे विचारायला माणसे पाठवलीस? म्हणून आता, ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.” 17 परमेश्वराचे जे वचन एलीयाने सांगितले होते त्याप्रमाणे राजा अहज्या मरण पावला. अहज्याला मुलगा नव्हता, याकारणामुळे अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहूदाचा राजा यहोशाफाट याचा मुलगा योराम याच्या दुसऱ्या वर्षी हे झाले. 18 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्याने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली नाहीत काय?

In Other Versions

2 Kings 1 in the ANGEFD

2 Kings 1 in the ANTPNG2D

2 Kings 1 in the AS21

2 Kings 1 in the BAGH

2 Kings 1 in the BBPNG

2 Kings 1 in the BBT1E

2 Kings 1 in the BDS

2 Kings 1 in the BEV

2 Kings 1 in the BHAD

2 Kings 1 in the BIB

2 Kings 1 in the BLPT

2 Kings 1 in the BNT

2 Kings 1 in the BNTABOOT

2 Kings 1 in the BNTLV

2 Kings 1 in the BOATCB

2 Kings 1 in the BOATCB2

2 Kings 1 in the BOBCV

2 Kings 1 in the BOCNT

2 Kings 1 in the BOECS

2 Kings 1 in the BOGWICC

2 Kings 1 in the BOHCB

2 Kings 1 in the BOHCV

2 Kings 1 in the BOHLNT

2 Kings 1 in the BOHNTLTAL

2 Kings 1 in the BOICB

2 Kings 1 in the BOILNTAP

2 Kings 1 in the BOITCV

2 Kings 1 in the BOKCV

2 Kings 1 in the BOKCV2

2 Kings 1 in the BOKHWOG

2 Kings 1 in the BOKSSV

2 Kings 1 in the BOLCB

2 Kings 1 in the BOLCB2

2 Kings 1 in the BOMCV

2 Kings 1 in the BONAV

2 Kings 1 in the BONCB

2 Kings 1 in the BONLT

2 Kings 1 in the BONUT2

2 Kings 1 in the BOPLNT

2 Kings 1 in the BOSCB

2 Kings 1 in the BOSNC

2 Kings 1 in the BOTLNT

2 Kings 1 in the BOVCB

2 Kings 1 in the BOYCB

2 Kings 1 in the BPBB

2 Kings 1 in the BPH

2 Kings 1 in the BSB

2 Kings 1 in the CCB

2 Kings 1 in the CUV

2 Kings 1 in the CUVS

2 Kings 1 in the DBT

2 Kings 1 in the DGDNT

2 Kings 1 in the DHNT

2 Kings 1 in the DNT

2 Kings 1 in the ELBE

2 Kings 1 in the EMTV

2 Kings 1 in the ESV

2 Kings 1 in the FBV

2 Kings 1 in the FEB

2 Kings 1 in the GGMNT

2 Kings 1 in the GNT

2 Kings 1 in the HARY

2 Kings 1 in the HNT

2 Kings 1 in the IRVA

2 Kings 1 in the IRVB

2 Kings 1 in the IRVG

2 Kings 1 in the IRVH

2 Kings 1 in the IRVK

2 Kings 1 in the IRVM2

2 Kings 1 in the IRVO

2 Kings 1 in the IRVP

2 Kings 1 in the IRVT

2 Kings 1 in the IRVT2

2 Kings 1 in the IRVU

2 Kings 1 in the ISVN

2 Kings 1 in the JSNT

2 Kings 1 in the KAPI

2 Kings 1 in the KBT1ETNIK

2 Kings 1 in the KBV

2 Kings 1 in the KJV

2 Kings 1 in the KNFD

2 Kings 1 in the LBA

2 Kings 1 in the LBLA

2 Kings 1 in the LNT

2 Kings 1 in the LSV

2 Kings 1 in the MAAL

2 Kings 1 in the MBV

2 Kings 1 in the MBV2

2 Kings 1 in the MHNT

2 Kings 1 in the MKNFD

2 Kings 1 in the MNG

2 Kings 1 in the MNT

2 Kings 1 in the MNT2

2 Kings 1 in the MRS1T

2 Kings 1 in the NAA

2 Kings 1 in the NASB

2 Kings 1 in the NBLA

2 Kings 1 in the NBS

2 Kings 1 in the NBVTP

2 Kings 1 in the NET2

2 Kings 1 in the NIV11

2 Kings 1 in the NNT

2 Kings 1 in the NNT2

2 Kings 1 in the NNT3

2 Kings 1 in the PDDPT

2 Kings 1 in the PFNT

2 Kings 1 in the RMNT

2 Kings 1 in the SBIAS

2 Kings 1 in the SBIBS

2 Kings 1 in the SBIBS2

2 Kings 1 in the SBICS

2 Kings 1 in the SBIDS

2 Kings 1 in the SBIGS

2 Kings 1 in the SBIHS

2 Kings 1 in the SBIIS

2 Kings 1 in the SBIIS2

2 Kings 1 in the SBIIS3

2 Kings 1 in the SBIKS

2 Kings 1 in the SBIKS2

2 Kings 1 in the SBIMS

2 Kings 1 in the SBIOS

2 Kings 1 in the SBIPS

2 Kings 1 in the SBISS

2 Kings 1 in the SBITS

2 Kings 1 in the SBITS2

2 Kings 1 in the SBITS3

2 Kings 1 in the SBITS4

2 Kings 1 in the SBIUS

2 Kings 1 in the SBIVS

2 Kings 1 in the SBT

2 Kings 1 in the SBT1E

2 Kings 1 in the SCHL

2 Kings 1 in the SNT

2 Kings 1 in the SUSU

2 Kings 1 in the SUSU2

2 Kings 1 in the SYNO

2 Kings 1 in the TBIAOTANT

2 Kings 1 in the TBT1E

2 Kings 1 in the TBT1E2

2 Kings 1 in the TFTIP

2 Kings 1 in the TFTU

2 Kings 1 in the TGNTATF3T

2 Kings 1 in the THAI

2 Kings 1 in the TNFD

2 Kings 1 in the TNT

2 Kings 1 in the TNTIK

2 Kings 1 in the TNTIL

2 Kings 1 in the TNTIN

2 Kings 1 in the TNTIP

2 Kings 1 in the TNTIZ

2 Kings 1 in the TOMA

2 Kings 1 in the TTENT

2 Kings 1 in the UBG

2 Kings 1 in the UGV

2 Kings 1 in the UGV2

2 Kings 1 in the UGV3

2 Kings 1 in the VBL

2 Kings 1 in the VDCC

2 Kings 1 in the YALU

2 Kings 1 in the YAPE

2 Kings 1 in the YBVTP

2 Kings 1 in the ZBP