Exodus 33 (IRVM)

1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा. 2 तुमच्यापुढे चालण्यासाठी मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांस तेथून घालवून देईन. 3 दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन.” 4 ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत; 5 कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.” 6 म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यांवाचून राहिले. 7 मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई. 8 ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत. 9 जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. 10 जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत. 11 मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे. 12 मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. 13 आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.” 14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.” 15 मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस. 16 तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?” 17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.” 18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.” 19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन. 20 परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.” 21 परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन; 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”

In Other Versions

Exodus 33 in the ANGEFD

Exodus 33 in the ANTPNG2D

Exodus 33 in the AS21

Exodus 33 in the BAGH

Exodus 33 in the BBPNG

Exodus 33 in the BBT1E

Exodus 33 in the BDS

Exodus 33 in the BEV

Exodus 33 in the BHAD

Exodus 33 in the BIB

Exodus 33 in the BLPT

Exodus 33 in the BNT

Exodus 33 in the BNTABOOT

Exodus 33 in the BNTLV

Exodus 33 in the BOATCB

Exodus 33 in the BOATCB2

Exodus 33 in the BOBCV

Exodus 33 in the BOCNT

Exodus 33 in the BOECS

Exodus 33 in the BOGWICC

Exodus 33 in the BOHCB

Exodus 33 in the BOHCV

Exodus 33 in the BOHLNT

Exodus 33 in the BOHNTLTAL

Exodus 33 in the BOICB

Exodus 33 in the BOILNTAP

Exodus 33 in the BOITCV

Exodus 33 in the BOKCV

Exodus 33 in the BOKCV2

Exodus 33 in the BOKHWOG

Exodus 33 in the BOKSSV

Exodus 33 in the BOLCB

Exodus 33 in the BOLCB2

Exodus 33 in the BOMCV

Exodus 33 in the BONAV

Exodus 33 in the BONCB

Exodus 33 in the BONLT

Exodus 33 in the BONUT2

Exodus 33 in the BOPLNT

Exodus 33 in the BOSCB

Exodus 33 in the BOSNC

Exodus 33 in the BOTLNT

Exodus 33 in the BOVCB

Exodus 33 in the BOYCB

Exodus 33 in the BPBB

Exodus 33 in the BPH

Exodus 33 in the BSB

Exodus 33 in the CCB

Exodus 33 in the CUV

Exodus 33 in the CUVS

Exodus 33 in the DBT

Exodus 33 in the DGDNT

Exodus 33 in the DHNT

Exodus 33 in the DNT

Exodus 33 in the ELBE

Exodus 33 in the EMTV

Exodus 33 in the ESV

Exodus 33 in the FBV

Exodus 33 in the FEB

Exodus 33 in the GGMNT

Exodus 33 in the GNT

Exodus 33 in the HARY

Exodus 33 in the HNT

Exodus 33 in the IRVA

Exodus 33 in the IRVB

Exodus 33 in the IRVG

Exodus 33 in the IRVH

Exodus 33 in the IRVK

Exodus 33 in the IRVM2

Exodus 33 in the IRVO

Exodus 33 in the IRVP

Exodus 33 in the IRVT

Exodus 33 in the IRVT2

Exodus 33 in the IRVU

Exodus 33 in the ISVN

Exodus 33 in the JSNT

Exodus 33 in the KAPI

Exodus 33 in the KBT1ETNIK

Exodus 33 in the KBV

Exodus 33 in the KJV

Exodus 33 in the KNFD

Exodus 33 in the LBA

Exodus 33 in the LBLA

Exodus 33 in the LNT

Exodus 33 in the LSV

Exodus 33 in the MAAL

Exodus 33 in the MBV

Exodus 33 in the MBV2

Exodus 33 in the MHNT

Exodus 33 in the MKNFD

Exodus 33 in the MNG

Exodus 33 in the MNT

Exodus 33 in the MNT2

Exodus 33 in the MRS1T

Exodus 33 in the NAA

Exodus 33 in the NASB

Exodus 33 in the NBLA

Exodus 33 in the NBS

Exodus 33 in the NBVTP

Exodus 33 in the NET2

Exodus 33 in the NIV11

Exodus 33 in the NNT

Exodus 33 in the NNT2

Exodus 33 in the NNT3

Exodus 33 in the PDDPT

Exodus 33 in the PFNT

Exodus 33 in the RMNT

Exodus 33 in the SBIAS

Exodus 33 in the SBIBS

Exodus 33 in the SBIBS2

Exodus 33 in the SBICS

Exodus 33 in the SBIDS

Exodus 33 in the SBIGS

Exodus 33 in the SBIHS

Exodus 33 in the SBIIS

Exodus 33 in the SBIIS2

Exodus 33 in the SBIIS3

Exodus 33 in the SBIKS

Exodus 33 in the SBIKS2

Exodus 33 in the SBIMS

Exodus 33 in the SBIOS

Exodus 33 in the SBIPS

Exodus 33 in the SBISS

Exodus 33 in the SBITS

Exodus 33 in the SBITS2

Exodus 33 in the SBITS3

Exodus 33 in the SBITS4

Exodus 33 in the SBIUS

Exodus 33 in the SBIVS

Exodus 33 in the SBT

Exodus 33 in the SBT1E

Exodus 33 in the SCHL

Exodus 33 in the SNT

Exodus 33 in the SUSU

Exodus 33 in the SUSU2

Exodus 33 in the SYNO

Exodus 33 in the TBIAOTANT

Exodus 33 in the TBT1E

Exodus 33 in the TBT1E2

Exodus 33 in the TFTIP

Exodus 33 in the TFTU

Exodus 33 in the TGNTATF3T

Exodus 33 in the THAI

Exodus 33 in the TNFD

Exodus 33 in the TNT

Exodus 33 in the TNTIK

Exodus 33 in the TNTIL

Exodus 33 in the TNTIN

Exodus 33 in the TNTIP

Exodus 33 in the TNTIZ

Exodus 33 in the TOMA

Exodus 33 in the TTENT

Exodus 33 in the UBG

Exodus 33 in the UGV

Exodus 33 in the UGV2

Exodus 33 in the UGV3

Exodus 33 in the VBL

Exodus 33 in the VDCC

Exodus 33 in the YALU

Exodus 33 in the YAPE

Exodus 33 in the YBVTP

Exodus 33 in the ZBP