Genesis 17 (IRVM)
1 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा. 2 तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.” 3 मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला, 4 “पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील. 5 येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे. 6 मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. 7 मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन. 8 ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.” 9 नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा. 10 माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी. 11 माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा, तुम्ही आपली सुंता करून घ्यावी. 12 पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसानी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो. 13 अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील. 14 ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.” 15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल. 16 मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.” 17 अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?” 18 अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!” 19 देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल. 20 तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन. 21 परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.” 22 देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला. 23 त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली. 24 अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. 25 आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. 26 अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली. 27 त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.
In Other Versions
Genesis 17 in the ANGEFD
Genesis 17 in the ANTPNG2D
Genesis 17 in the AS21
Genesis 17 in the BAGH
Genesis 17 in the BBPNG
Genesis 17 in the BBT1E
Genesis 17 in the BDS
Genesis 17 in the BEV
Genesis 17 in the BHAD
Genesis 17 in the BIB
Genesis 17 in the BLPT
Genesis 17 in the BNT
Genesis 17 in the BNTABOOT
Genesis 17 in the BNTLV
Genesis 17 in the BOATCB
Genesis 17 in the BOATCB2
Genesis 17 in the BOBCV
Genesis 17 in the BOCNT
Genesis 17 in the BOECS
Genesis 17 in the BOGWICC
Genesis 17 in the BOHCB
Genesis 17 in the BOHCV
Genesis 17 in the BOHLNT
Genesis 17 in the BOHNTLTAL
Genesis 17 in the BOICB
Genesis 17 in the BOILNTAP
Genesis 17 in the BOITCV
Genesis 17 in the BOKCV
Genesis 17 in the BOKCV2
Genesis 17 in the BOKHWOG
Genesis 17 in the BOKSSV
Genesis 17 in the BOLCB
Genesis 17 in the BOLCB2
Genesis 17 in the BOMCV
Genesis 17 in the BONAV
Genesis 17 in the BONCB
Genesis 17 in the BONLT
Genesis 17 in the BONUT2
Genesis 17 in the BOPLNT
Genesis 17 in the BOSCB
Genesis 17 in the BOSNC
Genesis 17 in the BOTLNT
Genesis 17 in the BOVCB
Genesis 17 in the BOYCB
Genesis 17 in the BPBB
Genesis 17 in the BPH
Genesis 17 in the BSB
Genesis 17 in the CCB
Genesis 17 in the CUV
Genesis 17 in the CUVS
Genesis 17 in the DBT
Genesis 17 in the DGDNT
Genesis 17 in the DHNT
Genesis 17 in the DNT
Genesis 17 in the ELBE
Genesis 17 in the EMTV
Genesis 17 in the ESV
Genesis 17 in the FBV
Genesis 17 in the FEB
Genesis 17 in the GGMNT
Genesis 17 in the GNT
Genesis 17 in the HARY
Genesis 17 in the HNT
Genesis 17 in the IRVA
Genesis 17 in the IRVB
Genesis 17 in the IRVG
Genesis 17 in the IRVH
Genesis 17 in the IRVK
Genesis 17 in the IRVM2
Genesis 17 in the IRVO
Genesis 17 in the IRVP
Genesis 17 in the IRVT
Genesis 17 in the IRVT2
Genesis 17 in the IRVU
Genesis 17 in the ISVN
Genesis 17 in the JSNT
Genesis 17 in the KAPI
Genesis 17 in the KBT1ETNIK
Genesis 17 in the KBV
Genesis 17 in the KJV
Genesis 17 in the KNFD
Genesis 17 in the LBA
Genesis 17 in the LBLA
Genesis 17 in the LNT
Genesis 17 in the LSV
Genesis 17 in the MAAL
Genesis 17 in the MBV
Genesis 17 in the MBV2
Genesis 17 in the MHNT
Genesis 17 in the MKNFD
Genesis 17 in the MNG
Genesis 17 in the MNT
Genesis 17 in the MNT2
Genesis 17 in the MRS1T
Genesis 17 in the NAA
Genesis 17 in the NASB
Genesis 17 in the NBLA
Genesis 17 in the NBS
Genesis 17 in the NBVTP
Genesis 17 in the NET2
Genesis 17 in the NIV11
Genesis 17 in the NNT
Genesis 17 in the NNT2
Genesis 17 in the NNT3
Genesis 17 in the PDDPT
Genesis 17 in the PFNT
Genesis 17 in the RMNT
Genesis 17 in the SBIAS
Genesis 17 in the SBIBS
Genesis 17 in the SBIBS2
Genesis 17 in the SBICS
Genesis 17 in the SBIDS
Genesis 17 in the SBIGS
Genesis 17 in the SBIHS
Genesis 17 in the SBIIS
Genesis 17 in the SBIIS2
Genesis 17 in the SBIIS3
Genesis 17 in the SBIKS
Genesis 17 in the SBIKS2
Genesis 17 in the SBIMS
Genesis 17 in the SBIOS
Genesis 17 in the SBIPS
Genesis 17 in the SBISS
Genesis 17 in the SBITS
Genesis 17 in the SBITS2
Genesis 17 in the SBITS3
Genesis 17 in the SBITS4
Genesis 17 in the SBIUS
Genesis 17 in the SBIVS
Genesis 17 in the SBT
Genesis 17 in the SBT1E
Genesis 17 in the SCHL
Genesis 17 in the SNT
Genesis 17 in the SUSU
Genesis 17 in the SUSU2
Genesis 17 in the SYNO
Genesis 17 in the TBIAOTANT
Genesis 17 in the TBT1E
Genesis 17 in the TBT1E2
Genesis 17 in the TFTIP
Genesis 17 in the TFTU
Genesis 17 in the TGNTATF3T
Genesis 17 in the THAI
Genesis 17 in the TNFD
Genesis 17 in the TNT
Genesis 17 in the TNTIK
Genesis 17 in the TNTIL
Genesis 17 in the TNTIN
Genesis 17 in the TNTIP
Genesis 17 in the TNTIZ
Genesis 17 in the TOMA
Genesis 17 in the TTENT
Genesis 17 in the UBG
Genesis 17 in the UGV
Genesis 17 in the UGV2
Genesis 17 in the UGV3
Genesis 17 in the VBL
Genesis 17 in the VDCC
Genesis 17 in the YALU
Genesis 17 in the YAPE
Genesis 17 in the YBVTP
Genesis 17 in the ZBP