Jeremiah 39 (IRVM)

1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या नवव्या वर्षात आणि दहाव्या महिन्यात, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरूशलेमाविरूद्ध चालून आला आणि त्यास वेढा घातला. 2 सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरूशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले. 3 मग बाबेलाच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरूशलेमेत आले आणि मधल्या दरवाजाजवळ बसले. नेर्गल शरेसर, समगार नबो, व सर्सखीम हे महत्वाचे अधिकारी होते. नेर्गल-शरेसर हा उच्च अधिकारी होता. आणि इतर सर्व बाबेलचे अधिकारी होते. 4 असे झाले की, जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया आणि त्याच्या लढाऊ मनुष्यांनी त्यांना पाहिले, ते पळून गेले. ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने नगरातून तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून निघून गेले. राजा अराबाकडच्या मार्गाने निघून गेला. 5 पण खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून आणि यार्देन नदीच्या खोऱ्याच्या मैदानात यरिहोच्याजवळ सिद्कीयाला गाठले. मग त्यांनी त्यास पकडले आणि हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे आणले, जेथे नबुखद्नेस्सराने त्याच्यावर शिक्षा ठरविली. 6 रिब्लामध्ये, बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, त्याच्या स्वतःच्या मुलांना जिवे मारले; त्याने यहूदातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा जिवे मारले. 7 मग त्याने सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास बाबेलाला नेण्यासाठी कास्य साखळ्यांनी बांधले. 8 नंतर खास्द्यांनी राजाच्या घराला व लोकांच्या घरांना आग लावली. त्यांनी यरूशलेमेची तटबंदी फोडली. 9 राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान ह्याने नगरामध्ये राहिलेल्या लोकांस, जे लोक खास्द्यांना सोडून गेले होते आणि जे कोणी नगरात उरलेले लोक होते, त्यांना कैदी करून बाबेलास नेले. 10 पण राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने ज्यांच्याजवळ स्वतःचे काहीच नव्हते अशा गरीब लोकांस यहूदा देशात राहण्याची परवानगी दिली. त्याने त्याच दिवशी त्यांना द्राक्षमळे व शेते दिली. 11 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यिर्मयाच्या बाबतीत, राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदानाला ताकीद दिली होती; तो म्हणाला, 12 “त्याला घेऊन व त्याची काळजी घे. त्यास इजा करु नको. तो जे काही सांगेल ते त्याच्यासाठी कर.” 13 म्हणून राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने, नबूशजबान या उच्च अधिकारी, नेर्गल-शरेसर या उच्च अधिकाऱ्याला आणि बाबेल राज्यातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविले. 14 त्यांच्या मनुष्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणातून काढले आणि शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याने त्यास घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मया लोकांमध्ये राहू लागला. 15 आता तो यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात कैदेत असताना परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. ते म्हणाले, 16 एबद-मलेख कूशीशी बोल आणि सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतोः पाहा, मी माझी वचने या नगराविरूद्ध अरिष्टासाठी आणील आणि चांगल्यासाठी नाही. त्या दिवशी त्या सर्व तुझ्यासमक्ष खऱ्या होतील. 17 पण, मी तुला त्यादिवशी वाचवीन. असे परमेश्वर म्हणतो. आणि तू ज्यांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही. 18 कारण मी तुला खात्रीने वाचवीन. तू तलवारीने पडणार नाहीस. तुझा जीव तुला लूट असा होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. असे परमेश्वर म्हणतो.

In Other Versions

Jeremiah 39 in the ANGEFD

Jeremiah 39 in the ANTPNG2D

Jeremiah 39 in the AS21

Jeremiah 39 in the BAGH

Jeremiah 39 in the BBPNG

Jeremiah 39 in the BBT1E

Jeremiah 39 in the BDS

Jeremiah 39 in the BEV

Jeremiah 39 in the BHAD

Jeremiah 39 in the BIB

Jeremiah 39 in the BLPT

Jeremiah 39 in the BNT

Jeremiah 39 in the BNTABOOT

Jeremiah 39 in the BNTLV

Jeremiah 39 in the BOATCB

Jeremiah 39 in the BOATCB2

Jeremiah 39 in the BOBCV

Jeremiah 39 in the BOCNT

Jeremiah 39 in the BOECS

Jeremiah 39 in the BOGWICC

Jeremiah 39 in the BOHCB

Jeremiah 39 in the BOHCV

Jeremiah 39 in the BOHLNT

Jeremiah 39 in the BOHNTLTAL

Jeremiah 39 in the BOICB

Jeremiah 39 in the BOILNTAP

Jeremiah 39 in the BOITCV

Jeremiah 39 in the BOKCV

Jeremiah 39 in the BOKCV2

Jeremiah 39 in the BOKHWOG

Jeremiah 39 in the BOKSSV

Jeremiah 39 in the BOLCB

Jeremiah 39 in the BOLCB2

Jeremiah 39 in the BOMCV

Jeremiah 39 in the BONAV

Jeremiah 39 in the BONCB

Jeremiah 39 in the BONLT

Jeremiah 39 in the BONUT2

Jeremiah 39 in the BOPLNT

Jeremiah 39 in the BOSCB

Jeremiah 39 in the BOSNC

Jeremiah 39 in the BOTLNT

Jeremiah 39 in the BOVCB

Jeremiah 39 in the BOYCB

Jeremiah 39 in the BPBB

Jeremiah 39 in the BPH

Jeremiah 39 in the BSB

Jeremiah 39 in the CCB

Jeremiah 39 in the CUV

Jeremiah 39 in the CUVS

Jeremiah 39 in the DBT

Jeremiah 39 in the DGDNT

Jeremiah 39 in the DHNT

Jeremiah 39 in the DNT

Jeremiah 39 in the ELBE

Jeremiah 39 in the EMTV

Jeremiah 39 in the ESV

Jeremiah 39 in the FBV

Jeremiah 39 in the FEB

Jeremiah 39 in the GGMNT

Jeremiah 39 in the GNT

Jeremiah 39 in the HARY

Jeremiah 39 in the HNT

Jeremiah 39 in the IRVA

Jeremiah 39 in the IRVB

Jeremiah 39 in the IRVG

Jeremiah 39 in the IRVH

Jeremiah 39 in the IRVK

Jeremiah 39 in the IRVM2

Jeremiah 39 in the IRVO

Jeremiah 39 in the IRVP

Jeremiah 39 in the IRVT

Jeremiah 39 in the IRVT2

Jeremiah 39 in the IRVU

Jeremiah 39 in the ISVN

Jeremiah 39 in the JSNT

Jeremiah 39 in the KAPI

Jeremiah 39 in the KBT1ETNIK

Jeremiah 39 in the KBV

Jeremiah 39 in the KJV

Jeremiah 39 in the KNFD

Jeremiah 39 in the LBA

Jeremiah 39 in the LBLA

Jeremiah 39 in the LNT

Jeremiah 39 in the LSV

Jeremiah 39 in the MAAL

Jeremiah 39 in the MBV

Jeremiah 39 in the MBV2

Jeremiah 39 in the MHNT

Jeremiah 39 in the MKNFD

Jeremiah 39 in the MNG

Jeremiah 39 in the MNT

Jeremiah 39 in the MNT2

Jeremiah 39 in the MRS1T

Jeremiah 39 in the NAA

Jeremiah 39 in the NASB

Jeremiah 39 in the NBLA

Jeremiah 39 in the NBS

Jeremiah 39 in the NBVTP

Jeremiah 39 in the NET2

Jeremiah 39 in the NIV11

Jeremiah 39 in the NNT

Jeremiah 39 in the NNT2

Jeremiah 39 in the NNT3

Jeremiah 39 in the PDDPT

Jeremiah 39 in the PFNT

Jeremiah 39 in the RMNT

Jeremiah 39 in the SBIAS

Jeremiah 39 in the SBIBS

Jeremiah 39 in the SBIBS2

Jeremiah 39 in the SBICS

Jeremiah 39 in the SBIDS

Jeremiah 39 in the SBIGS

Jeremiah 39 in the SBIHS

Jeremiah 39 in the SBIIS

Jeremiah 39 in the SBIIS2

Jeremiah 39 in the SBIIS3

Jeremiah 39 in the SBIKS

Jeremiah 39 in the SBIKS2

Jeremiah 39 in the SBIMS

Jeremiah 39 in the SBIOS

Jeremiah 39 in the SBIPS

Jeremiah 39 in the SBISS

Jeremiah 39 in the SBITS

Jeremiah 39 in the SBITS2

Jeremiah 39 in the SBITS3

Jeremiah 39 in the SBITS4

Jeremiah 39 in the SBIUS

Jeremiah 39 in the SBIVS

Jeremiah 39 in the SBT

Jeremiah 39 in the SBT1E

Jeremiah 39 in the SCHL

Jeremiah 39 in the SNT

Jeremiah 39 in the SUSU

Jeremiah 39 in the SUSU2

Jeremiah 39 in the SYNO

Jeremiah 39 in the TBIAOTANT

Jeremiah 39 in the TBT1E

Jeremiah 39 in the TBT1E2

Jeremiah 39 in the TFTIP

Jeremiah 39 in the TFTU

Jeremiah 39 in the TGNTATF3T

Jeremiah 39 in the THAI

Jeremiah 39 in the TNFD

Jeremiah 39 in the TNT

Jeremiah 39 in the TNTIK

Jeremiah 39 in the TNTIL

Jeremiah 39 in the TNTIN

Jeremiah 39 in the TNTIP

Jeremiah 39 in the TNTIZ

Jeremiah 39 in the TOMA

Jeremiah 39 in the TTENT

Jeremiah 39 in the UBG

Jeremiah 39 in the UGV

Jeremiah 39 in the UGV2

Jeremiah 39 in the UGV3

Jeremiah 39 in the VBL

Jeremiah 39 in the VDCC

Jeremiah 39 in the YALU

Jeremiah 39 in the YAPE

Jeremiah 39 in the YBVTP

Jeremiah 39 in the ZBP