Psalms 93 (IRVM)
1 परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे;परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे.जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही. 2 तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे;तू सर्वकाळापासून आहेस. 3 हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे;आपला आवाज उंचावला आहे,महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. 4 खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंडलाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेलापरमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. 5 तुझे नियम अतिसत्य आहेत;हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रतासदासर्वकाळ शोभते.