1 Chronicles 17 (IRVM)

1 आणि असे झाले की, राजा दावीद आपल्या घरी राहत होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच राहत आहे.” 2 तेव्हा नाथान दावीदास म्हणाला, “जा, तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.” 3 पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानाकडे आले व म्हणाले, 4 “जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही. 5 कारण मी इस्राएलांस वर आणले त्यादिवसापासून आजपर्यंत मी मंदिरात राहिलेलो नाही. त्याऐवजी, मी विविध ठिकाणी, तंबूतून व मंडपातूनच राहत आलो आहे. 6 सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही ‘माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?’” 7 “तर आता, माझा सेवक दावीद याला सांग की, ‘सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे” की, तू माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला गायरानातून, मेंढरांच्या मागून काढून घेतले. 8 आणि जेथे कोठे तू गेलास त्याठिकाणी मी तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून कापून टाकले. आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन. 9 माझ्या इस्राएल लोकांस मी एक जागा नेमून देईन आणि त्यांना त्याठिकाणी स्थिर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही. 10 मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील. 11 आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्यास मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन. 12 तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्याचे सिंहासन सर्वकाळ स्थापित करीन. 13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता. त्याच्यावरची मी माझी कृपादृष्टी काढून घेतली तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही. 14 मी त्यास माझ्या घरात आणि राज्यात सर्वकाळ ठेवीन, त्याचे राजासन सर्वकाळ स्थापीन. 15 नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्यास सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले. 16 नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, “हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यंत आणले आहे?” 17 आणि हे देवा, तुझ्यादृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसांबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत. 18 तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस. 19 हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतू पूर्ण व्हावा, म्हणून तू या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस. 20 हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुजसमान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही. 21 आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले. 22 तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. 23 म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर. 24 तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे. 25 कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरिता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे. 26 आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे. 27 तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.

In Other Versions

1 Chronicles 17 in the ANGEFD

1 Chronicles 17 in the ANTPNG2D

1 Chronicles 17 in the AS21

1 Chronicles 17 in the BAGH

1 Chronicles 17 in the BBPNG

1 Chronicles 17 in the BBT1E

1 Chronicles 17 in the BDS

1 Chronicles 17 in the BEV

1 Chronicles 17 in the BHAD

1 Chronicles 17 in the BIB

1 Chronicles 17 in the BLPT

1 Chronicles 17 in the BNT

1 Chronicles 17 in the BNTABOOT

1 Chronicles 17 in the BNTLV

1 Chronicles 17 in the BOATCB

1 Chronicles 17 in the BOATCB2

1 Chronicles 17 in the BOBCV

1 Chronicles 17 in the BOCNT

1 Chronicles 17 in the BOECS

1 Chronicles 17 in the BOGWICC

1 Chronicles 17 in the BOHCB

1 Chronicles 17 in the BOHCV

1 Chronicles 17 in the BOHLNT

1 Chronicles 17 in the BOHNTLTAL

1 Chronicles 17 in the BOICB

1 Chronicles 17 in the BOILNTAP

1 Chronicles 17 in the BOITCV

1 Chronicles 17 in the BOKCV

1 Chronicles 17 in the BOKCV2

1 Chronicles 17 in the BOKHWOG

1 Chronicles 17 in the BOKSSV

1 Chronicles 17 in the BOLCB

1 Chronicles 17 in the BOLCB2

1 Chronicles 17 in the BOMCV

1 Chronicles 17 in the BONAV

1 Chronicles 17 in the BONCB

1 Chronicles 17 in the BONLT

1 Chronicles 17 in the BONUT2

1 Chronicles 17 in the BOPLNT

1 Chronicles 17 in the BOSCB

1 Chronicles 17 in the BOSNC

1 Chronicles 17 in the BOTLNT

1 Chronicles 17 in the BOVCB

1 Chronicles 17 in the BOYCB

1 Chronicles 17 in the BPBB

1 Chronicles 17 in the BPH

1 Chronicles 17 in the BSB

1 Chronicles 17 in the CCB

1 Chronicles 17 in the CUV

1 Chronicles 17 in the CUVS

1 Chronicles 17 in the DBT

1 Chronicles 17 in the DGDNT

1 Chronicles 17 in the DHNT

1 Chronicles 17 in the DNT

1 Chronicles 17 in the ELBE

1 Chronicles 17 in the EMTV

1 Chronicles 17 in the ESV

1 Chronicles 17 in the FBV

1 Chronicles 17 in the FEB

1 Chronicles 17 in the GGMNT

1 Chronicles 17 in the GNT

1 Chronicles 17 in the HARY

1 Chronicles 17 in the HNT

1 Chronicles 17 in the IRVA

1 Chronicles 17 in the IRVB

1 Chronicles 17 in the IRVG

1 Chronicles 17 in the IRVH

1 Chronicles 17 in the IRVK

1 Chronicles 17 in the IRVM2

1 Chronicles 17 in the IRVO

1 Chronicles 17 in the IRVP

1 Chronicles 17 in the IRVT

1 Chronicles 17 in the IRVT2

1 Chronicles 17 in the IRVU

1 Chronicles 17 in the ISVN

1 Chronicles 17 in the JSNT

1 Chronicles 17 in the KAPI

1 Chronicles 17 in the KBT1ETNIK

1 Chronicles 17 in the KBV

1 Chronicles 17 in the KJV

1 Chronicles 17 in the KNFD

1 Chronicles 17 in the LBA

1 Chronicles 17 in the LBLA

1 Chronicles 17 in the LNT

1 Chronicles 17 in the LSV

1 Chronicles 17 in the MAAL

1 Chronicles 17 in the MBV

1 Chronicles 17 in the MBV2

1 Chronicles 17 in the MHNT

1 Chronicles 17 in the MKNFD

1 Chronicles 17 in the MNG

1 Chronicles 17 in the MNT

1 Chronicles 17 in the MNT2

1 Chronicles 17 in the MRS1T

1 Chronicles 17 in the NAA

1 Chronicles 17 in the NASB

1 Chronicles 17 in the NBLA

1 Chronicles 17 in the NBS

1 Chronicles 17 in the NBVTP

1 Chronicles 17 in the NET2

1 Chronicles 17 in the NIV11

1 Chronicles 17 in the NNT

1 Chronicles 17 in the NNT2

1 Chronicles 17 in the NNT3

1 Chronicles 17 in the PDDPT

1 Chronicles 17 in the PFNT

1 Chronicles 17 in the RMNT

1 Chronicles 17 in the SBIAS

1 Chronicles 17 in the SBIBS

1 Chronicles 17 in the SBIBS2

1 Chronicles 17 in the SBICS

1 Chronicles 17 in the SBIDS

1 Chronicles 17 in the SBIGS

1 Chronicles 17 in the SBIHS

1 Chronicles 17 in the SBIIS

1 Chronicles 17 in the SBIIS2

1 Chronicles 17 in the SBIIS3

1 Chronicles 17 in the SBIKS

1 Chronicles 17 in the SBIKS2

1 Chronicles 17 in the SBIMS

1 Chronicles 17 in the SBIOS

1 Chronicles 17 in the SBIPS

1 Chronicles 17 in the SBISS

1 Chronicles 17 in the SBITS

1 Chronicles 17 in the SBITS2

1 Chronicles 17 in the SBITS3

1 Chronicles 17 in the SBITS4

1 Chronicles 17 in the SBIUS

1 Chronicles 17 in the SBIVS

1 Chronicles 17 in the SBT

1 Chronicles 17 in the SBT1E

1 Chronicles 17 in the SCHL

1 Chronicles 17 in the SNT

1 Chronicles 17 in the SUSU

1 Chronicles 17 in the SUSU2

1 Chronicles 17 in the SYNO

1 Chronicles 17 in the TBIAOTANT

1 Chronicles 17 in the TBT1E

1 Chronicles 17 in the TBT1E2

1 Chronicles 17 in the TFTIP

1 Chronicles 17 in the TFTU

1 Chronicles 17 in the TGNTATF3T

1 Chronicles 17 in the THAI

1 Chronicles 17 in the TNFD

1 Chronicles 17 in the TNT

1 Chronicles 17 in the TNTIK

1 Chronicles 17 in the TNTIL

1 Chronicles 17 in the TNTIN

1 Chronicles 17 in the TNTIP

1 Chronicles 17 in the TNTIZ

1 Chronicles 17 in the TOMA

1 Chronicles 17 in the TTENT

1 Chronicles 17 in the UBG

1 Chronicles 17 in the UGV

1 Chronicles 17 in the UGV2

1 Chronicles 17 in the UGV3

1 Chronicles 17 in the VBL

1 Chronicles 17 in the VDCC

1 Chronicles 17 in the YALU

1 Chronicles 17 in the YAPE

1 Chronicles 17 in the YBVTP

1 Chronicles 17 in the ZBP