Genesis 11 (IRVM)
1 आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. 2 ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली. 3 ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते. 4 मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.” 5 आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला. 6 परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही. 7 चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” 8 मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. 9 त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. 10 ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला. 11 अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला. 12 अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला. 13 शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 14 जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला; 15 एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 16 एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला. 17 पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 18 पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला. 19 रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 20 रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला. 21 सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 22 सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला. 23 नाहोराला जन्म दिल्यावर सरुग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 24 नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला. 25 तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला. 26 तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. 27 तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला. 28 हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला. 29 अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता. 30 साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. 31 मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले. 32 तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.
In Other Versions
Genesis 11 in the ANGEFD
Genesis 11 in the ANTPNG2D
Genesis 11 in the AS21
Genesis 11 in the BAGH
Genesis 11 in the BBPNG
Genesis 11 in the BBT1E
Genesis 11 in the BDS
Genesis 11 in the BEV
Genesis 11 in the BHAD
Genesis 11 in the BIB
Genesis 11 in the BLPT
Genesis 11 in the BNT
Genesis 11 in the BNTABOOT
Genesis 11 in the BNTLV
Genesis 11 in the BOATCB
Genesis 11 in the BOATCB2
Genesis 11 in the BOBCV
Genesis 11 in the BOCNT
Genesis 11 in the BOECS
Genesis 11 in the BOGWICC
Genesis 11 in the BOHCB
Genesis 11 in the BOHCV
Genesis 11 in the BOHLNT
Genesis 11 in the BOHNTLTAL
Genesis 11 in the BOICB
Genesis 11 in the BOILNTAP
Genesis 11 in the BOITCV
Genesis 11 in the BOKCV
Genesis 11 in the BOKCV2
Genesis 11 in the BOKHWOG
Genesis 11 in the BOKSSV
Genesis 11 in the BOLCB
Genesis 11 in the BOLCB2
Genesis 11 in the BOMCV
Genesis 11 in the BONAV
Genesis 11 in the BONCB
Genesis 11 in the BONLT
Genesis 11 in the BONUT2
Genesis 11 in the BOPLNT
Genesis 11 in the BOSCB
Genesis 11 in the BOSNC
Genesis 11 in the BOTLNT
Genesis 11 in the BOVCB
Genesis 11 in the BOYCB
Genesis 11 in the BPBB
Genesis 11 in the BPH
Genesis 11 in the BSB
Genesis 11 in the CCB
Genesis 11 in the CUV
Genesis 11 in the CUVS
Genesis 11 in the DBT
Genesis 11 in the DGDNT
Genesis 11 in the DHNT
Genesis 11 in the DNT
Genesis 11 in the ELBE
Genesis 11 in the EMTV
Genesis 11 in the ESV
Genesis 11 in the FBV
Genesis 11 in the FEB
Genesis 11 in the GGMNT
Genesis 11 in the GNT
Genesis 11 in the HARY
Genesis 11 in the HNT
Genesis 11 in the IRVA
Genesis 11 in the IRVB
Genesis 11 in the IRVG
Genesis 11 in the IRVH
Genesis 11 in the IRVK
Genesis 11 in the IRVM2
Genesis 11 in the IRVO
Genesis 11 in the IRVP
Genesis 11 in the IRVT
Genesis 11 in the IRVT2
Genesis 11 in the IRVU
Genesis 11 in the ISVN
Genesis 11 in the JSNT
Genesis 11 in the KAPI
Genesis 11 in the KBT1ETNIK
Genesis 11 in the KBV
Genesis 11 in the KJV
Genesis 11 in the KNFD
Genesis 11 in the LBA
Genesis 11 in the LBLA
Genesis 11 in the LNT
Genesis 11 in the LSV
Genesis 11 in the MAAL
Genesis 11 in the MBV
Genesis 11 in the MBV2
Genesis 11 in the MHNT
Genesis 11 in the MKNFD
Genesis 11 in the MNG
Genesis 11 in the MNT
Genesis 11 in the MNT2
Genesis 11 in the MRS1T
Genesis 11 in the NAA
Genesis 11 in the NASB
Genesis 11 in the NBLA
Genesis 11 in the NBS
Genesis 11 in the NBVTP
Genesis 11 in the NET2
Genesis 11 in the NIV11
Genesis 11 in the NNT
Genesis 11 in the NNT2
Genesis 11 in the NNT3
Genesis 11 in the PDDPT
Genesis 11 in the PFNT
Genesis 11 in the RMNT
Genesis 11 in the SBIAS
Genesis 11 in the SBIBS
Genesis 11 in the SBIBS2
Genesis 11 in the SBICS
Genesis 11 in the SBIDS
Genesis 11 in the SBIGS
Genesis 11 in the SBIHS
Genesis 11 in the SBIIS
Genesis 11 in the SBIIS2
Genesis 11 in the SBIIS3
Genesis 11 in the SBIKS
Genesis 11 in the SBIKS2
Genesis 11 in the SBIMS
Genesis 11 in the SBIOS
Genesis 11 in the SBIPS
Genesis 11 in the SBISS
Genesis 11 in the SBITS
Genesis 11 in the SBITS2
Genesis 11 in the SBITS3
Genesis 11 in the SBITS4
Genesis 11 in the SBIUS
Genesis 11 in the SBIVS
Genesis 11 in the SBT
Genesis 11 in the SBT1E
Genesis 11 in the SCHL
Genesis 11 in the SNT
Genesis 11 in the SUSU
Genesis 11 in the SUSU2
Genesis 11 in the SYNO
Genesis 11 in the TBIAOTANT
Genesis 11 in the TBT1E
Genesis 11 in the TBT1E2
Genesis 11 in the TFTIP
Genesis 11 in the TFTU
Genesis 11 in the TGNTATF3T
Genesis 11 in the THAI
Genesis 11 in the TNFD
Genesis 11 in the TNT
Genesis 11 in the TNTIK
Genesis 11 in the TNTIL
Genesis 11 in the TNTIN
Genesis 11 in the TNTIP
Genesis 11 in the TNTIZ
Genesis 11 in the TOMA
Genesis 11 in the TTENT
Genesis 11 in the UBG
Genesis 11 in the UGV
Genesis 11 in the UGV2
Genesis 11 in the UGV3
Genesis 11 in the VBL
Genesis 11 in the VDCC
Genesis 11 in the YALU
Genesis 11 in the YAPE
Genesis 11 in the YBVTP
Genesis 11 in the ZBP