Psalms 125 (IRVM)
1 जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात;ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत. 2 यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवतीआता आणि सर्वकाळ आहे. 3 नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही.नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील. 4 हे परमेश्वरा, जे चांगले आहेत,आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर. 5 पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात,परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल.इस्राएलांवर शांती असो.