Deuteronomy 29 (IRVM)

1 इस्राएलाशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात देखील पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो पवित्र करार हा होय: 2 मोशेने सर्व इस्राएलांना बोलावून सांगितले, मिसर देशामध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे. 3 ती महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहीले आहेत. 4 पण आजपर्यंतही परमेश्वराने तुम्हास समजायला मन, बघण्यास डोळे व ऐकण्यास कान दिलेले नाही. 5 परमेश्वराने तुम्हास वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. 6 तुम्ही भाकरी खाल्ली नाही की द्राक्षरस अथवा मद्य प्यायला नाही. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने असे केले. 7 तुम्ही येथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपल्यावर चढाई करून आले. पण आपण त्यांचा पराभव केला. 8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना इनाम म्हणून दिला. 9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हास सर्व कार्यात असेच यश मिळत राहील. 10 आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडिलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल वंशज, तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात. 11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे ही आज याकरीता उभे आहेत. 12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे. 13 त्याद्वारे तो तुम्हास आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हास आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 14 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी आज इथे करतो असे नव्हे, 15 तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर असलेल्या व हजर नसलेल्यासाठीही आहे. 16 आपण मिसरमध्ये कसे राहत होतो ते तुम्हास आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला हे तुम्हास माहीतच आहे. 17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तूही पाहील्या, 18 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत्त होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, स्त्री, एखादे कुटुंब किंवा कुळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विष व कडूदवणा प्रमाणे असतात. 19 एखादा हे कराराचे बोलणे ऐकूनही, मी मला हवे तेच करणार. माझे चागंलेच होईल असे स्वत:चे समाधान करून घेत असेल. तर त्याचा त्यास त्रास होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळून जाईल. 20 परमेश्वर अशा मनुष्यास क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर भयानक कोप होईल. या ग्रंथातील सर्व शाप त्यास लागतील, आणि परमेश्वर भुतलावरून त्याची नावनिशाणी पुसून टाकील. 21 या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल. 22 या देशाचा कसा नाश झाला हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती याप्रकारे परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयिम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल. 24 “परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?” असे इतर राष्ट्रांतील लोक विचारतील. 25 त्याचे उत्तर असे की, “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांस बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते. 27 म्हणून त्यांच्यावर परमेश्वर क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्याबाबतीत खरी करून दाखवली. 28 क्रोधीष्ट होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?” 29 काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.

In Other Versions

Deuteronomy 29 in the ANGEFD

Deuteronomy 29 in the ANTPNG2D

Deuteronomy 29 in the AS21

Deuteronomy 29 in the BAGH

Deuteronomy 29 in the BBPNG

Deuteronomy 29 in the BBT1E

Deuteronomy 29 in the BDS

Deuteronomy 29 in the BEV

Deuteronomy 29 in the BHAD

Deuteronomy 29 in the BIB

Deuteronomy 29 in the BLPT

Deuteronomy 29 in the BNT

Deuteronomy 29 in the BNTABOOT

Deuteronomy 29 in the BNTLV

Deuteronomy 29 in the BOATCB

Deuteronomy 29 in the BOATCB2

Deuteronomy 29 in the BOBCV

Deuteronomy 29 in the BOCNT

Deuteronomy 29 in the BOECS

Deuteronomy 29 in the BOGWICC

Deuteronomy 29 in the BOHCB

Deuteronomy 29 in the BOHCV

Deuteronomy 29 in the BOHLNT

Deuteronomy 29 in the BOHNTLTAL

Deuteronomy 29 in the BOICB

Deuteronomy 29 in the BOILNTAP

Deuteronomy 29 in the BOITCV

Deuteronomy 29 in the BOKCV

Deuteronomy 29 in the BOKCV2

Deuteronomy 29 in the BOKHWOG

Deuteronomy 29 in the BOKSSV

Deuteronomy 29 in the BOLCB

Deuteronomy 29 in the BOLCB2

Deuteronomy 29 in the BOMCV

Deuteronomy 29 in the BONAV

Deuteronomy 29 in the BONCB

Deuteronomy 29 in the BONLT

Deuteronomy 29 in the BONUT2

Deuteronomy 29 in the BOPLNT

Deuteronomy 29 in the BOSCB

Deuteronomy 29 in the BOSNC

Deuteronomy 29 in the BOTLNT

Deuteronomy 29 in the BOVCB

Deuteronomy 29 in the BOYCB

Deuteronomy 29 in the BPBB

Deuteronomy 29 in the BPH

Deuteronomy 29 in the BSB

Deuteronomy 29 in the CCB

Deuteronomy 29 in the CUV

Deuteronomy 29 in the CUVS

Deuteronomy 29 in the DBT

Deuteronomy 29 in the DGDNT

Deuteronomy 29 in the DHNT

Deuteronomy 29 in the DNT

Deuteronomy 29 in the ELBE

Deuteronomy 29 in the EMTV

Deuteronomy 29 in the ESV

Deuteronomy 29 in the FBV

Deuteronomy 29 in the FEB

Deuteronomy 29 in the GGMNT

Deuteronomy 29 in the GNT

Deuteronomy 29 in the HARY

Deuteronomy 29 in the HNT

Deuteronomy 29 in the IRVA

Deuteronomy 29 in the IRVB

Deuteronomy 29 in the IRVG

Deuteronomy 29 in the IRVH

Deuteronomy 29 in the IRVK

Deuteronomy 29 in the IRVM2

Deuteronomy 29 in the IRVO

Deuteronomy 29 in the IRVP

Deuteronomy 29 in the IRVT

Deuteronomy 29 in the IRVT2

Deuteronomy 29 in the IRVU

Deuteronomy 29 in the ISVN

Deuteronomy 29 in the JSNT

Deuteronomy 29 in the KAPI

Deuteronomy 29 in the KBT1ETNIK

Deuteronomy 29 in the KBV

Deuteronomy 29 in the KJV

Deuteronomy 29 in the KNFD

Deuteronomy 29 in the LBA

Deuteronomy 29 in the LBLA

Deuteronomy 29 in the LNT

Deuteronomy 29 in the LSV

Deuteronomy 29 in the MAAL

Deuteronomy 29 in the MBV

Deuteronomy 29 in the MBV2

Deuteronomy 29 in the MHNT

Deuteronomy 29 in the MKNFD

Deuteronomy 29 in the MNG

Deuteronomy 29 in the MNT

Deuteronomy 29 in the MNT2

Deuteronomy 29 in the MRS1T

Deuteronomy 29 in the NAA

Deuteronomy 29 in the NASB

Deuteronomy 29 in the NBLA

Deuteronomy 29 in the NBS

Deuteronomy 29 in the NBVTP

Deuteronomy 29 in the NET2

Deuteronomy 29 in the NIV11

Deuteronomy 29 in the NNT

Deuteronomy 29 in the NNT2

Deuteronomy 29 in the NNT3

Deuteronomy 29 in the PDDPT

Deuteronomy 29 in the PFNT

Deuteronomy 29 in the RMNT

Deuteronomy 29 in the SBIAS

Deuteronomy 29 in the SBIBS

Deuteronomy 29 in the SBIBS2

Deuteronomy 29 in the SBICS

Deuteronomy 29 in the SBIDS

Deuteronomy 29 in the SBIGS

Deuteronomy 29 in the SBIHS

Deuteronomy 29 in the SBIIS

Deuteronomy 29 in the SBIIS2

Deuteronomy 29 in the SBIIS3

Deuteronomy 29 in the SBIKS

Deuteronomy 29 in the SBIKS2

Deuteronomy 29 in the SBIMS

Deuteronomy 29 in the SBIOS

Deuteronomy 29 in the SBIPS

Deuteronomy 29 in the SBISS

Deuteronomy 29 in the SBITS

Deuteronomy 29 in the SBITS2

Deuteronomy 29 in the SBITS3

Deuteronomy 29 in the SBITS4

Deuteronomy 29 in the SBIUS

Deuteronomy 29 in the SBIVS

Deuteronomy 29 in the SBT

Deuteronomy 29 in the SBT1E

Deuteronomy 29 in the SCHL

Deuteronomy 29 in the SNT

Deuteronomy 29 in the SUSU

Deuteronomy 29 in the SUSU2

Deuteronomy 29 in the SYNO

Deuteronomy 29 in the TBIAOTANT

Deuteronomy 29 in the TBT1E

Deuteronomy 29 in the TBT1E2

Deuteronomy 29 in the TFTIP

Deuteronomy 29 in the TFTU

Deuteronomy 29 in the TGNTATF3T

Deuteronomy 29 in the THAI

Deuteronomy 29 in the TNFD

Deuteronomy 29 in the TNT

Deuteronomy 29 in the TNTIK

Deuteronomy 29 in the TNTIL

Deuteronomy 29 in the TNTIN

Deuteronomy 29 in the TNTIP

Deuteronomy 29 in the TNTIZ

Deuteronomy 29 in the TOMA

Deuteronomy 29 in the TTENT

Deuteronomy 29 in the UBG

Deuteronomy 29 in the UGV

Deuteronomy 29 in the UGV2

Deuteronomy 29 in the UGV3

Deuteronomy 29 in the VBL

Deuteronomy 29 in the VDCC

Deuteronomy 29 in the YALU

Deuteronomy 29 in the YAPE

Deuteronomy 29 in the YBVTP

Deuteronomy 29 in the ZBP