Job 25 (IRVM)
1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, 2 “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे,तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. 3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय?कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? 4 मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल?स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. 5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही.त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. 6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”