Job 38 (IRVM)
1 नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला, 2 कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो,म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द? 3 आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध,मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे. 4 मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास?तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे. 5 जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग?मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का? 6 तीचा पाया कशावर घातला आहे?तिची कोनशिला कोणी ठेवली? 7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केलेआणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला. 8 जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडलातेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला? 9 त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकलेआणि काळोखात गुंडाळले. 10 मी समुद्राला मर्यादा घातल्याआणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले. 11 मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही.तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील. 12 तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायलाआणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का? 13 तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडूनदुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का? 14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात.दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात 15 दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहेआणि त्यांचा उंच भूज मोडला आहे. 16 सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का?समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का? 17 मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का?काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का? 18 ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का?तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग. 19 प्रकाश कुठून येतो?काळोख कुठून येतो? 20 तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का?तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का? 21 तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतीलतू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना? 22 मी ज्या भांडारात हिम आणिगारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का? 23 मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी,युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो. 24 सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का?पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का? 25 जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले?गरजणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग मोकळा केला? 26 वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो? 27 निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते. 28 पावसास वडील आहेत का?दवबिंदू कुठून येतात? 29 हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे?आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो? 30 पाणी दगडासारखे गोठते.सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो. 31 तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का?तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का? 32 तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का?किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का? 33 तुला आकाशातील नियम माहीत आहेत का?तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का? 34 तुला मेघावर ओरडूनत्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का? 35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का?ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का? 36 लोकांस शहाणे कोण बनवतो?त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो? 37 ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे?त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो? 38 त्यामुळे धुळीचा चिखल होतोआणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात. 39 तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का?त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का? 40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात.ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात. 41 कावळ्याला कोण अन्न देतो?जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतातआणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो?