Psalms 82 (IRVM)
undefined आसाफाचे स्तोत्र 1 देव दैवी मंडळीत उभा आहे,तो देवांच्यामध्ये न्याय देतो. 2 कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल?आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल? 3 गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे;त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा. 4 त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा. 5 “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत;ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात;पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.” 6 मी म्हणालो, “तुम्ही देव आहात,आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.” 7 तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल,आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल. 8 हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर,कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.