Romans 14 (IRVM)

1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही. 2 कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो. 3 जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. 4 दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे. 5 आणि कोणी एखादा दिवस दुसर्‍या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी. 6 जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो. 7 कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही. 8 कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत. 9 कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. 10 मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील,आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’ 12 तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल. 13 तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये. 14 मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे. 15 पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस. 16 म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका. 17 कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे. 18 कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो. 19 तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या. 20 अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे. 21 मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे. 22 तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय. 23 पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.

In Other Versions

Romans 14 in the ANGEFD

Romans 14 in the ANTPNG2D

Romans 14 in the AS21

Romans 14 in the BAGH

Romans 14 in the BBPNG

Romans 14 in the BBT1E

Romans 14 in the BDS

Romans 14 in the BEV

Romans 14 in the BHAD

Romans 14 in the BIB

Romans 14 in the BLPT

Romans 14 in the BNT

Romans 14 in the BNTABOOT

Romans 14 in the BNTLV

Romans 14 in the BOATCB

Romans 14 in the BOATCB2

Romans 14 in the BOBCV

Romans 14 in the BOCNT

Romans 14 in the BOECS

Romans 14 in the BOGWICC

Romans 14 in the BOHCB

Romans 14 in the BOHCV

Romans 14 in the BOHLNT

Romans 14 in the BOHNTLTAL

Romans 14 in the BOICB

Romans 14 in the BOILNTAP

Romans 14 in the BOITCV

Romans 14 in the BOKCV

Romans 14 in the BOKCV2

Romans 14 in the BOKHWOG

Romans 14 in the BOKSSV

Romans 14 in the BOLCB

Romans 14 in the BOLCB2

Romans 14 in the BOMCV

Romans 14 in the BONAV

Romans 14 in the BONCB

Romans 14 in the BONLT

Romans 14 in the BONUT2

Romans 14 in the BOPLNT

Romans 14 in the BOSCB

Romans 14 in the BOSNC

Romans 14 in the BOTLNT

Romans 14 in the BOVCB

Romans 14 in the BOYCB

Romans 14 in the BPBB

Romans 14 in the BPH

Romans 14 in the BSB

Romans 14 in the CCB

Romans 14 in the CUV

Romans 14 in the CUVS

Romans 14 in the DBT

Romans 14 in the DGDNT

Romans 14 in the DHNT

Romans 14 in the DNT

Romans 14 in the ELBE

Romans 14 in the EMTV

Romans 14 in the ESV

Romans 14 in the FBV

Romans 14 in the FEB

Romans 14 in the GGMNT

Romans 14 in the GNT

Romans 14 in the HARY

Romans 14 in the HNT

Romans 14 in the IRVA

Romans 14 in the IRVB

Romans 14 in the IRVG

Romans 14 in the IRVH

Romans 14 in the IRVK

Romans 14 in the IRVM2

Romans 14 in the IRVO

Romans 14 in the IRVP

Romans 14 in the IRVT

Romans 14 in the IRVT2

Romans 14 in the IRVU

Romans 14 in the ISVN

Romans 14 in the JSNT

Romans 14 in the KAPI

Romans 14 in the KBT1ETNIK

Romans 14 in the KBV

Romans 14 in the KJV

Romans 14 in the KNFD

Romans 14 in the LBA

Romans 14 in the LBLA

Romans 14 in the LNT

Romans 14 in the LSV

Romans 14 in the MAAL

Romans 14 in the MBV

Romans 14 in the MBV2

Romans 14 in the MHNT

Romans 14 in the MKNFD

Romans 14 in the MNG

Romans 14 in the MNT

Romans 14 in the MNT2

Romans 14 in the MRS1T

Romans 14 in the NAA

Romans 14 in the NASB

Romans 14 in the NBLA

Romans 14 in the NBS

Romans 14 in the NBVTP

Romans 14 in the NET2

Romans 14 in the NIV11

Romans 14 in the NNT

Romans 14 in the NNT2

Romans 14 in the NNT3

Romans 14 in the PDDPT

Romans 14 in the PFNT

Romans 14 in the RMNT

Romans 14 in the SBIAS

Romans 14 in the SBIBS

Romans 14 in the SBIBS2

Romans 14 in the SBICS

Romans 14 in the SBIDS

Romans 14 in the SBIGS

Romans 14 in the SBIHS

Romans 14 in the SBIIS

Romans 14 in the SBIIS2

Romans 14 in the SBIIS3

Romans 14 in the SBIKS

Romans 14 in the SBIKS2

Romans 14 in the SBIMS

Romans 14 in the SBIOS

Romans 14 in the SBIPS

Romans 14 in the SBISS

Romans 14 in the SBITS

Romans 14 in the SBITS2

Romans 14 in the SBITS3

Romans 14 in the SBITS4

Romans 14 in the SBIUS

Romans 14 in the SBIVS

Romans 14 in the SBT

Romans 14 in the SBT1E

Romans 14 in the SCHL

Romans 14 in the SNT

Romans 14 in the SUSU

Romans 14 in the SUSU2

Romans 14 in the SYNO

Romans 14 in the TBIAOTANT

Romans 14 in the TBT1E

Romans 14 in the TBT1E2

Romans 14 in the TFTIP

Romans 14 in the TFTU

Romans 14 in the TGNTATF3T

Romans 14 in the THAI

Romans 14 in the TNFD

Romans 14 in the TNT

Romans 14 in the TNTIK

Romans 14 in the TNTIL

Romans 14 in the TNTIN

Romans 14 in the TNTIP

Romans 14 in the TNTIZ

Romans 14 in the TOMA

Romans 14 in the TTENT

Romans 14 in the UBG

Romans 14 in the UGV

Romans 14 in the UGV2

Romans 14 in the UGV3

Romans 14 in the VBL

Romans 14 in the VDCC

Romans 14 in the YALU

Romans 14 in the YAPE

Romans 14 in the YBVTP

Romans 14 in the ZBP