2 Chronicles 13 (IRVM)
1 इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला. 2 त्याने यरूशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली. 3 अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला. 4 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका, 5 दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे. 6 पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरुध्द बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता. 7 मग कुचकामी आणि वाईट मनुष्यांशी यराबामाशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरूद्ध होती. रहबाम जेव्हा तरुण आणि अनुभवी होता. त्यास यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही. 8 आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत. 9 परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले नाही का? हे याजक अहरोनाचे व लेवीचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वत:वर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो. 10 “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात. 11 परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे. 12 पाहा खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यामध्ये तुम्हास यश येणार नाही.” 13 पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला. 14 यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामाच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले. 15 मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला त्याचवेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामाच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला. 16 इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला देवाने यहूदाच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला. 17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले. 18 अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहूदा सैन्याने विजय मिळवला. 19 अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला. 20 अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला. 21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्यास बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या. 22 इद्दो या भविष्याद्याच्या नोंद वह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.
In Other Versions
2 Chronicles 13 in the ANTPNG2D
2 Chronicles 13 in the BNTABOOT
2 Chronicles 13 in the BOATCB2
2 Chronicles 13 in the BOGWICC
2 Chronicles 13 in the BOHNTLTAL
2 Chronicles 13 in the BOILNTAP
2 Chronicles 13 in the BOKHWOG
2 Chronicles 13 in the KBT1ETNIK
2 Chronicles 13 in the TBIAOTANT