Psalms 11 (IRVM)
undefined मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. 1 परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो;पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा,असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? 2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून,दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. 3 कारण जर पायेच नष्ट केले,तर न्यायी काय करणार? 4 परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे;त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. 5 परमेश्वर नितीमानाची पारख करतो.परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. 6 तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील,दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल. 7 कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे.सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.