Psalms 68 (IRVM)

undefined दाविदाचे स्तोत्र 1 देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत;जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत. 2 जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक;जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत. 3 परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत;ते हर्षोत आणि आनंदी होवोत. 4 देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा. 5 तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो. 6 देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो;तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो;पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात. 7 हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला,जेव्हा तू रानातून चालत गेलास, 8 तेव्हा भूमी कापली;देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला,देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला. 9 हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास;जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस. 10 तुझे लोक त्यामध्ये राहिले;हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले. 11 परमेश्वराने आज्ञा दिली,आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते. 12 सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात,आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते. 13 जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता,तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत,अशा कबुतरासारखे तुम्ही आहात. 14 तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे,तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले. 15 हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता,उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे. 16 देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे,त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस?खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील. 17 देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत.जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे. 18 तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे;मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढलेत्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत,यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे. 19 प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो,देव आमचे तारण आहे. 20 आमचा देव आम्हास तारणारा देव आहे;मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे. 21 पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल,जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल. 22 परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन,समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन. 23 यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा,आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा. 24 हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत,पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत. 25 गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत,आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत. 26 मंडळीत देवाचा धन्यवाद करा;जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. 27 तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ,यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदायजबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत. 28 तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे;हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव. 29 यरूशलेमातील मंदिराकरता,राजे तुला भेटी आणतील. 30 लव्हाळ्यात राहणारे वनपशू,बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव.जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव;जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक. 31 मिसरमधून सरदार येतील;कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील. 32 अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा,परमेश्वराची स्तुतिगीते गा. 33 जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो;पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो. 34 देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा;इस्राएलावर त्याचे वैभवआणि आकाशात त्याचे बल आहे. 35 हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे;इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो.देव धन्यवादित असो.

In Other Versions

Psalms 68 in the ANGEFD

Psalms 68 in the ANTPNG2D

Psalms 68 in the AS21

Psalms 68 in the BAGH

Psalms 68 in the BBPNG

Psalms 68 in the BBT1E

Psalms 68 in the BDS

Psalms 68 in the BEV

Psalms 68 in the BHAD

Psalms 68 in the BIB

Psalms 68 in the BLPT

Psalms 68 in the BNT

Psalms 68 in the BNTABOOT

Psalms 68 in the BNTLV

Psalms 68 in the BOATCB

Psalms 68 in the BOATCB2

Psalms 68 in the BOBCV

Psalms 68 in the BOCNT

Psalms 68 in the BOECS

Psalms 68 in the BOGWICC

Psalms 68 in the BOHCB

Psalms 68 in the BOHCV

Psalms 68 in the BOHLNT

Psalms 68 in the BOHNTLTAL

Psalms 68 in the BOICB

Psalms 68 in the BOILNTAP

Psalms 68 in the BOITCV

Psalms 68 in the BOKCV

Psalms 68 in the BOKCV2

Psalms 68 in the BOKHWOG

Psalms 68 in the BOKSSV

Psalms 68 in the BOLCB

Psalms 68 in the BOLCB2

Psalms 68 in the BOMCV

Psalms 68 in the BONAV

Psalms 68 in the BONCB

Psalms 68 in the BONLT

Psalms 68 in the BONUT2

Psalms 68 in the BOPLNT

Psalms 68 in the BOSCB

Psalms 68 in the BOSNC

Psalms 68 in the BOTLNT

Psalms 68 in the BOVCB

Psalms 68 in the BOYCB

Psalms 68 in the BPBB

Psalms 68 in the BPH

Psalms 68 in the BSB

Psalms 68 in the CCB

Psalms 68 in the CUV

Psalms 68 in the CUVS

Psalms 68 in the DBT

Psalms 68 in the DGDNT

Psalms 68 in the DHNT

Psalms 68 in the DNT

Psalms 68 in the ELBE

Psalms 68 in the EMTV

Psalms 68 in the ESV

Psalms 68 in the FBV

Psalms 68 in the FEB

Psalms 68 in the GGMNT

Psalms 68 in the GNT

Psalms 68 in the HARY

Psalms 68 in the HNT

Psalms 68 in the IRVA

Psalms 68 in the IRVB

Psalms 68 in the IRVG

Psalms 68 in the IRVH

Psalms 68 in the IRVK

Psalms 68 in the IRVM2

Psalms 68 in the IRVO

Psalms 68 in the IRVP

Psalms 68 in the IRVT

Psalms 68 in the IRVT2

Psalms 68 in the IRVU

Psalms 68 in the ISVN

Psalms 68 in the JSNT

Psalms 68 in the KAPI

Psalms 68 in the KBT1ETNIK

Psalms 68 in the KBV

Psalms 68 in the KJV

Psalms 68 in the KNFD

Psalms 68 in the LBA

Psalms 68 in the LBLA

Psalms 68 in the LNT

Psalms 68 in the LSV

Psalms 68 in the MAAL

Psalms 68 in the MBV

Psalms 68 in the MBV2

Psalms 68 in the MHNT

Psalms 68 in the MKNFD

Psalms 68 in the MNG

Psalms 68 in the MNT

Psalms 68 in the MNT2

Psalms 68 in the MRS1T

Psalms 68 in the NAA

Psalms 68 in the NASB

Psalms 68 in the NBLA

Psalms 68 in the NBS

Psalms 68 in the NBVTP

Psalms 68 in the NET2

Psalms 68 in the NIV11

Psalms 68 in the NNT

Psalms 68 in the NNT2

Psalms 68 in the NNT3

Psalms 68 in the PDDPT

Psalms 68 in the PFNT

Psalms 68 in the RMNT

Psalms 68 in the SBIAS

Psalms 68 in the SBIBS

Psalms 68 in the SBIBS2

Psalms 68 in the SBICS

Psalms 68 in the SBIDS

Psalms 68 in the SBIGS

Psalms 68 in the SBIHS

Psalms 68 in the SBIIS

Psalms 68 in the SBIIS2

Psalms 68 in the SBIIS3

Psalms 68 in the SBIKS

Psalms 68 in the SBIKS2

Psalms 68 in the SBIMS

Psalms 68 in the SBIOS

Psalms 68 in the SBIPS

Psalms 68 in the SBISS

Psalms 68 in the SBITS

Psalms 68 in the SBITS2

Psalms 68 in the SBITS3

Psalms 68 in the SBITS4

Psalms 68 in the SBIUS

Psalms 68 in the SBIVS

Psalms 68 in the SBT

Psalms 68 in the SBT1E

Psalms 68 in the SCHL

Psalms 68 in the SNT

Psalms 68 in the SUSU

Psalms 68 in the SUSU2

Psalms 68 in the SYNO

Psalms 68 in the TBIAOTANT

Psalms 68 in the TBT1E

Psalms 68 in the TBT1E2

Psalms 68 in the TFTIP

Psalms 68 in the TFTU

Psalms 68 in the TGNTATF3T

Psalms 68 in the THAI

Psalms 68 in the TNFD

Psalms 68 in the TNT

Psalms 68 in the TNTIK

Psalms 68 in the TNTIL

Psalms 68 in the TNTIN

Psalms 68 in the TNTIP

Psalms 68 in the TNTIZ

Psalms 68 in the TOMA

Psalms 68 in the TTENT

Psalms 68 in the UBG

Psalms 68 in the UGV

Psalms 68 in the UGV2

Psalms 68 in the UGV3

Psalms 68 in the VBL

Psalms 68 in the VDCC

Psalms 68 in the YALU

Psalms 68 in the YAPE

Psalms 68 in the YBVTP

Psalms 68 in the ZBP