Psalms 107 (IRVM)

1 परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे.आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे. 2 परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरूनत्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे, 3 त्याने त्यांना परक्या देशातूनपूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिणया दिशातून एकवट केले आहे. 4 ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले;आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही. 5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते;आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले. 6 नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली,आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले. 7 त्याने त्यांना सरळ मार्गाने नेलेयासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी 8 अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियताआणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत. 9 कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले,आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले. 10 काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता;काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत. 11 त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले,आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले. 12 त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले;ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता. 13 तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारलीआणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले. 14 देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले,आणि त्यांची बंधणे तोडली. 15 परमेश्वराच्या कराराची विश्वसनियताआणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. 16 कारण त्याने पितळेची दारे तोडली,आणि लोखंडाचे गज तोडून टाकले. 17 आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते,आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते. 18 सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईनाआणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले. 19 तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली,आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले. 20 त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले,आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले. 21 परमेश्वराच्या कराराची विश्वसनियताव त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. 22 ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत,आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत. 23 काही जहाजातून समुद्र प्रवास करतात,आणि महासागरापार व्यवसाय करतात. 24 ते परमेश्वराची कृत्ये पाहतात,आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात. 25 कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो;तेव्हा समुद्र खवळतो. 26 लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात.मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते. 27 ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात,आणि त्यांची बुद्धी गुंग होते. 28 तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात,आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो. 29 तो वादळ शांत करतो,आणि लाटांना स्तब्ध करतो. 30 समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात,तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो. 31 परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियताआणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. 32 लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावोआणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो. 33 तो नद्यांना रान करतो,पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो, 34 आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो.कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे. 35 तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो,आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो. 36 तेथे भुकेल्यास वसवतो,आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो. 37 ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात,आणि विपुल पिके काढतात. 38 तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते,तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही. 39 नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळेते कमी होतात आणि नष्ट होतात. 40 तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो,आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो. 41 पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो,आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो. 42 सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात,आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात. 43 जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावेआणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे.

In Other Versions

Psalms 107 in the ANGEFD

Psalms 107 in the ANTPNG2D

Psalms 107 in the AS21

Psalms 107 in the BAGH

Psalms 107 in the BBPNG

Psalms 107 in the BBT1E

Psalms 107 in the BDS

Psalms 107 in the BEV

Psalms 107 in the BHAD

Psalms 107 in the BIB

Psalms 107 in the BLPT

Psalms 107 in the BNT

Psalms 107 in the BNTABOOT

Psalms 107 in the BNTLV

Psalms 107 in the BOATCB

Psalms 107 in the BOATCB2

Psalms 107 in the BOBCV

Psalms 107 in the BOCNT

Psalms 107 in the BOECS

Psalms 107 in the BOGWICC

Psalms 107 in the BOHCB

Psalms 107 in the BOHCV

Psalms 107 in the BOHLNT

Psalms 107 in the BOHNTLTAL

Psalms 107 in the BOICB

Psalms 107 in the BOILNTAP

Psalms 107 in the BOITCV

Psalms 107 in the BOKCV

Psalms 107 in the BOKCV2

Psalms 107 in the BOKHWOG

Psalms 107 in the BOKSSV

Psalms 107 in the BOLCB

Psalms 107 in the BOLCB2

Psalms 107 in the BOMCV

Psalms 107 in the BONAV

Psalms 107 in the BONCB

Psalms 107 in the BONLT

Psalms 107 in the BONUT2

Psalms 107 in the BOPLNT

Psalms 107 in the BOSCB

Psalms 107 in the BOSNC

Psalms 107 in the BOTLNT

Psalms 107 in the BOVCB

Psalms 107 in the BOYCB

Psalms 107 in the BPBB

Psalms 107 in the BPH

Psalms 107 in the BSB

Psalms 107 in the CCB

Psalms 107 in the CUV

Psalms 107 in the CUVS

Psalms 107 in the DBT

Psalms 107 in the DGDNT

Psalms 107 in the DHNT

Psalms 107 in the DNT

Psalms 107 in the ELBE

Psalms 107 in the EMTV

Psalms 107 in the ESV

Psalms 107 in the FBV

Psalms 107 in the FEB

Psalms 107 in the GGMNT

Psalms 107 in the GNT

Psalms 107 in the HARY

Psalms 107 in the HNT

Psalms 107 in the IRVA

Psalms 107 in the IRVB

Psalms 107 in the IRVG

Psalms 107 in the IRVH

Psalms 107 in the IRVK

Psalms 107 in the IRVM2

Psalms 107 in the IRVO

Psalms 107 in the IRVP

Psalms 107 in the IRVT

Psalms 107 in the IRVT2

Psalms 107 in the IRVU

Psalms 107 in the ISVN

Psalms 107 in the JSNT

Psalms 107 in the KAPI

Psalms 107 in the KBT1ETNIK

Psalms 107 in the KBV

Psalms 107 in the KJV

Psalms 107 in the KNFD

Psalms 107 in the LBA

Psalms 107 in the LBLA

Psalms 107 in the LNT

Psalms 107 in the LSV

Psalms 107 in the MAAL

Psalms 107 in the MBV

Psalms 107 in the MBV2

Psalms 107 in the MHNT

Psalms 107 in the MKNFD

Psalms 107 in the MNG

Psalms 107 in the MNT

Psalms 107 in the MNT2

Psalms 107 in the MRS1T

Psalms 107 in the NAA

Psalms 107 in the NASB

Psalms 107 in the NBLA

Psalms 107 in the NBS

Psalms 107 in the NBVTP

Psalms 107 in the NET2

Psalms 107 in the NIV11

Psalms 107 in the NNT

Psalms 107 in the NNT2

Psalms 107 in the NNT3

Psalms 107 in the PDDPT

Psalms 107 in the PFNT

Psalms 107 in the RMNT

Psalms 107 in the SBIAS

Psalms 107 in the SBIBS

Psalms 107 in the SBIBS2

Psalms 107 in the SBICS

Psalms 107 in the SBIDS

Psalms 107 in the SBIGS

Psalms 107 in the SBIHS

Psalms 107 in the SBIIS

Psalms 107 in the SBIIS2

Psalms 107 in the SBIIS3

Psalms 107 in the SBIKS

Psalms 107 in the SBIKS2

Psalms 107 in the SBIMS

Psalms 107 in the SBIOS

Psalms 107 in the SBIPS

Psalms 107 in the SBISS

Psalms 107 in the SBITS

Psalms 107 in the SBITS2

Psalms 107 in the SBITS3

Psalms 107 in the SBITS4

Psalms 107 in the SBIUS

Psalms 107 in the SBIVS

Psalms 107 in the SBT

Psalms 107 in the SBT1E

Psalms 107 in the SCHL

Psalms 107 in the SNT

Psalms 107 in the SUSU

Psalms 107 in the SUSU2

Psalms 107 in the SYNO

Psalms 107 in the TBIAOTANT

Psalms 107 in the TBT1E

Psalms 107 in the TBT1E2

Psalms 107 in the TFTIP

Psalms 107 in the TFTU

Psalms 107 in the TGNTATF3T

Psalms 107 in the THAI

Psalms 107 in the TNFD

Psalms 107 in the TNT

Psalms 107 in the TNTIK

Psalms 107 in the TNTIL

Psalms 107 in the TNTIN

Psalms 107 in the TNTIP

Psalms 107 in the TNTIZ

Psalms 107 in the TOMA

Psalms 107 in the TTENT

Psalms 107 in the UBG

Psalms 107 in the UGV

Psalms 107 in the UGV2

Psalms 107 in the UGV3

Psalms 107 in the VBL

Psalms 107 in the VDCC

Psalms 107 in the YALU

Psalms 107 in the YAPE

Psalms 107 in the YBVTP

Psalms 107 in the ZBP